
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स मंगळवारी 15 टक्के वाढीसह 45.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. ब्रोकरेज फर्म Elara Capital ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
Elara caoital फर्मच्या मते, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचा स्टॉक 63 रुपये किमतीवर जाऊ शकतो. ही किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा 54 टक्के जास्त आहे. आज बुधवार दिनांक 12 जून 2024 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी स्टॉक 4.95 टक्के वाढीसह 49.39 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मने माहिती दिली की, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने आपले संपूर्ण लक्ष आपली गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी केंद्रित केले आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी कंपनीला इन-हाउस कॉम्प्लेक्स आणि नागरी प्रकल्प राबविण्याचा अनुभव आहे.
इलारा फर्मच्या तज्ञांच्या मते, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीला जल विद्युत क्षमता आणि भारताच्या नागरी अणुऊर्जा क्षमतेचा फायदा मिळू शकतो. नुकताच क्रेडिट रेटिंग अपग्रेड आणि बँक गॅरंटी मर्यादेवरील निर्बंध काढून टाकल्याने एचसीसी कंपनीला नवीन करारांसाठी बोली लावण्याची परवानगी मिळाली आहे.
मागील वर्षी डिसेंबर 2023 मध्ये ICRA ने हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे रेटिंग B वरून वाढवून BB असे अपग्रेड केले होते. या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 41.04 इंट्राडे नीचांकी पातळीवर ओपन झाले होते. आणि दिवसभरात हा स्टॉक 45.45 रुपये या इंट्राडे उच्चाकावर पोहचला होता. मागील पाच दिवसांत हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 34 टक्के परतावा कमावून दिला आहे.
YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 130 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचा स्टॉक तब्बल 260 टक्के वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 46 रुपये होती. तर नीचांक किंमत 17.05 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7620.78 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.