
Vikas Lifecare Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 437 अंकांच्या वाढीसह 76893 अंकावर ट्रेड करत होता. तर निफ्टी इंडेक्स 139 अंकांच्या वाढीसह 23403 अंकांवर ट्रेड करत होता. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये कोल इंडिया, पॉवर ग्रिड, बीपीसीएल, एलटीआय माइंड ट्री कंपनीचे शेअर्स सामील होते. तर विक्रीच्या दबावात ट्रेड करणाऱ्या शेअर्समध्ये ब्रिटानिया, टायटन, एचयूएल आणि एशियन पेंट्स कंपनीचे शेअर्स सामील होते. ( विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनी अंश )
सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही विकास लाइफ केअर स्टॉक खरेदी करू शकता. आज गुरूवार दिनांक 13 जून 2024 रोजी विकास लाइफ केअर स्टॉक 1.19 टक्के घसरणीसह 5.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
बुधवारी विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.80 टक्के वाढीसह 5.08 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 920 कोटी रुपये आहे. विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2.85 रुपये होती.
मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 2.90 रुपये या नीचांक किमतीवरून 75 टक्के वाढली आहे. 7 मे 2021 रोजी हा स्टॉक 2.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या किमतींवरुन हा स्टॉक 91 टक्के वाढला आहे.
विकास लाइफ केअर लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, 11 जून रोजी कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत कंपनीने 1.28 कोटी वॉरंटचे समान संख्येच्या इक्विटी शेअर्समध्ये रूपांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या कंपनीने हे वॉरंट प्रवर्तक आणि गैर-प्रवर्तक आणि सार्वजनिक गुंतवणूकदारांना 4 रुपये प्रति वॉरंट किमतीवर वाटप केले होते. या वॉरंटच्या रूपांतरणातून कंपनीने 3.84 कोटी रुपये निधी जमा केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.