
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर क्लोज झाले आहेत. गुरूवारी झोमॅटो स्टॉक 2.5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर आज शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 186.19 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस यूबीएसने झोमॅटो स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 135 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. यूबीएस फर्मने झोमॅटो स्टॉकवर बाय रेटिंग देऊन 250 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 13 जून 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 186 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 35 टक्के परतावा कमावून देऊ शकतो.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 135 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 55 टक्के वाढले आहेत. 2024 या वर्षात झोमॅटो स्टॉक तब्बल 48 टक्के मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 207.30 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 72.55 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.63 लाख कोटी रुपये आहे.
तज्ञांच्या मते, मे महिन्यात झोमॅटो कंपनीच्या ऑर्डर व्हॉल्यूममध्ये 4 टक्के वाढ झाली होती. एप्रिल 2024 मध्ये झोमॅटोची ऑर्डर वाढ 2.7 टक्के होती. आणि तर स्विगीची वाढ 4.4 टक्के होती. झोमॅटो कंपनीची वार्षिक ऑर्डर वाढ 30 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तज्ञांच्या मते, झोमॅटोची GMV वाढ 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 8 टक्के होणे अपेक्षित आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.