
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. या कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात तेजीत वाढत होते. मात्र चालू आठवड्याची सुरुवात किंचित घसरणीसह झाली आहे. नुकताच अनेक ब्रोकरेज फर्मनी टाटा मोटर्स स्टॉकची टारगेट प्राइस अपग्रेड केली आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1,235 रुपये किमतीवर जाऊ शकतात. टाटा मोटर्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,30,204.07 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 993.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे शेअर्स 1,065.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहेत. आज मंगळवार दिनांक 18 जून 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.84 टक्के घसरणीसह 985.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी टाटा मोटर्स कंपनीने 11 जून रोजी आपल्या 2 रुपये दर्शनी मुल्य असलेल्या शेअर्सवर 6 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. लाभांश देणी झाल्यानंतर, टाटा मोटर्स कंपनी 2:1 या प्रमाणात डिमर्जरवर करणार आहे. टाटा मोटर्स कंपनी लवकरच दोन सूचीबद्ध संस्थांमध्ये विभागली जाईल. या कंपनीचे कमर्शियल व्हेईकल्स आणि प्रवासी वाहनसोबत PV, EV, JLR, हे व्यवसाय विभाजित होणार आहेत.
शेअरखान फर्मने आपल्या अहवालात टाटा मोटर्स स्टॉक बाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. टाटा पॉवर कंपनी EV बॅटरी सेल उत्पादन प्लांटच्या माध्यमातून जलद उत्पादन प्रमाणीकरण मिळविण्यासाठी आणि तृतीय पक्ष पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासह ही कंपनी हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान, आणि हायड्रोजन स्पेसमध्ये व्यवसाय वाढीच्या शक्यता सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी JLR, PV आणि CV व्यवसायांमध्ये सतत होणाऱ्या सुधारणा पाहून आणि कंपनीचे निव्वळ ऑटोमोटिव्ह कर्ज कमी होण्याच्या अपेक्षेने टाटा मोटर्स स्टॉक 1235 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.