 
						Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्समध्ये सकारात्मक तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 3.45 टक्क्यांच्या वाढीसह 17.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120.65 टक्क्यापेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )
आज सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 0.58 टक्के वाढीसह 17.24 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना स्टॉक होल्ड करून संयम राखण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या शेअरमध्ये 18.50 रुपये ही किंमत एक महत्त्वाची पातळी ठरू शकते. व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स पुढील एक ते तीन महिन्यात 18.50 रुपये किंमत स्पर्श करतात की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जर हा स्टॉक 18.50 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर आणखी वाढू शकतो.
मागील एका वर्षात व्होडाफोन आयडिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 120 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 29.14 टक्के वाढली आहे. YTD आधारे या स्टॉकने गुंतवणुकदारांना 1.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 14.17 टक्के वाढली आहे. मागील पाच दिवसात व्होडाफोन आयडिया स्टॉक 2.31 टक्के वाढला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		