
NHPC Share Price | एनएचपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीने गुजरातमध्ये 846 कोटी रुपये मूल्याचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी करार केला आहे. 27 जून रोजी गुजरात उर्जा विकास निगम लिमिटेड या गुजरातस्थित राज्य वीज नियमन मंडळ आणि एनएचपीसी लिमिटेड यांच्यात वीज खरेदी करार संपन्न झाला आहे. ( एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारी एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.13 टक्क्यांच्या वाढीसह 100.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 2 जुलै 2024 रोजी एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरणीसह 99.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.01 लाख कोटी रुपये आहे.
एनएचपीसी लिमिटेड ही कंपनी कच्छ जिल्ह्यातील खवडा गावात असलेल्या गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या RE पार्कमध्ये 200 MW क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम करणार आहे. गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी गुजरात एनर्जी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे, जी मुख्यतः वीज निर्मितीचा व्यवसाय करते.
एनएचपीसी लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांना मिळालेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे मूल्य 846.66 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कंपनीला 15 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मागील एका वर्षात एनएचपीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 123 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक आतापर्यंत 57 टक्के वाढला आहे.
31 मार्च 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 18 टक्क्यांनी घसरून 610.93 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत एनएचपीसी लिमिटेड कंपनीने 745.27 कोटी रुपये नफा कमावला होता. मागील वर्षी मार्च 2023 तिमाहीत एनएचपीसी लिमिटेड कंपनीने 2028.77 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. त्या तुलनेत मार्च 2024 मध्ये कंपनीचा महसूल 7 टक्क्यांनी घसरून 1,888.14 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.