 
						NBCC Share Price | एनबीसीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळत आहे. तसेच दीपक फर्टिलायझर्स कंपनीचा स्टॉक देखील गुंतवणुकदारांना मालामाल करत आहे. बुधवारी सेन्सेक्स इंडेक्स 80000 अंकाच्या पार गेला होता. आणि निफ्टी इंडेक्सने देखील आपली उच्चांक पातळी स्पर्श केली आहे. दरम्यान मिडकॅप्समध्येही मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे.
सध्या सुरू असलेल्या शेअर बाजारातील तेजीचा फायदा घेण्यासाठी मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी 2 स्टॉक निवडले आहेत. हे शेअर्स पुढील काळात तुम्हाला जबरदस्त परतावा कमावून देऊ शकतात.
एनबीसीसी :
बुधवारी हा स्टॉक 3.5 टक्क्यांच्या वाढीसह 167 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्याची उच्चांक किंमत पातळी 176 रुपये होती. ही कंपनी मुख्यतः नागरी बांधकाम क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी पीएमसी, ईपीसी आणि रिअल इस्टेट व्यवसायात एक्स्पर्ट मानली जाते. तज्ञांनी या स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 145 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 205 रुपये टार्गेट प्राइससाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. ही टार्गेट प्राइस सध्याच्या किंमत पातळीपेक्षा 25-27 टक्के अधिक आहे. 2024 या वर्षात हा स्टॉक 105 टक्के आणि मागील एका वर्षात 325 टक्के वाढला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी एनबीसीसी स्टॉक 10.34 टक्के वाढीसह 186.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
दीपक फर्टिलायझर्स :
तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 760 रुपये होती. सध्या फर्टिलायझर्स स्टॉकबाबतचा शेअर बाजारातील तज्ञांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. तज्ञांनी हा स्टॉक 730-735 रुपये किमतीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 690 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावून 810 रुपये टार्गेट प्राइससाठी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 6 टक्के वाढली होती. मागील दोन आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 15 टक्के वाढली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 751.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		