
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील 6 महिन्यांपासून येस बँक स्टॉकमध्ये फारशी ॲक्शन पाहायला मिळाली नाहीये. गेल्या सहा महिन्यात हा स्टॉक फक्त 3 टक्के वाढला आहे. मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्समध्ये 40 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. येस बँक आपले जून 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल 20 जुलै रोजी जाहीर करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 5 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.042 टक्के घसरणीसह 23.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
ग्लोबल ब्रोकरेज फर्म Nomura ने येस बँक स्टॉकवर ‘न्यूट्रल’ रेटिंग जाहीर करून 17 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. या स्टॉकची टारगेट प्राइस बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमधील 29.93 रुपये किमतीच्या तुलनेत 29 टक्के कमी आहे. नोमुरा फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँकेचे जून तिमाही निकाल कर्ज वाढीमध्ये मंद वाढ दर्शवू शकतात. तिमाही आधारावर येस बँकेच्या ठेवींमध्येही घसरण झाली आहे. येस बँकेचे CASA प्रमाण मागील तिमाहीच्या तुलनेत घसरले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत येस बँकेचे CASA प्रमाण 17 बेसिस पॉइंट्सने घसरून 30.7 टक्के नोंदवले गेले आहे.
येस बँकेचा RoA आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 0.5 टक्के आणि 2026-27 मध्ये 0.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, येस बँकेचा RoE आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 4.5 टक्के आणि 2026-27 मध्ये 7.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, येस बँकेचे रिटर्न प्रोफाइल सुधारत आहेत, मात्र इतर बँकांच्या तुलनेत त्याचे प्रमाण अजूनही कमी आहे.
येस बँकेची प्रति शेअर बुक व्हॅल्यू ही बँकेसाठी सर्वात सकारात्मक गोष्ट आहे. तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकला चांगला परतावा देण्यासाठी 30 रुपयेची ब्रेकआऊट लेव्हल तोडावी लागेल. जर हा स्टॉक 30 रुपये किमतीच्या वर गेला तर अल्पावधीत 100 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.