
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी 8 जुलै 2024 रोजी देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होता. JLR कंपनीच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स स्टॉक फोकसमध्ये आला आहे. ( टाटा मोटर्स कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2024 या वर्षात आतापर्यंत हा स्टॉक 25 टक्क्यांनी वाढला आहे.
ब्रोकरेज हाऊस मॅक्वेरीने टाटा मोटर्स स्टॉकला ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग देऊन 1171 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तर जेपी मॉर्गन फर्मने या स्टॉकवर 1115 रुपये टार्गेट प्राइस जाहीर करून ‘ओव्हरवेट’ रेटिंग कायम ठेवली आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर्स 0.87 टक्क्यांच्या वाढीसह 1002.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 1.15 टक्के वाढीसह 1,014.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
तज्ञांच्या मते, जून तिमाहीत JLR कंपनीचे उत्पादन सकारात्मक असून कंपनीची मार्जिन चांगली राहण्याची अपेक्षा आहे. जून 2024 तिमाहीत JLR कंपनीची घाऊक विक्री चीन वगळता 97.8 हजार रुपये नोंदवली गेली आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या सेल्समध्ये 5 टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी कंपनीची एकूण विक्री 1.11 लाख कोटी रुपये नोंदवली गेली होती. वार्षिक आधारावर हे प्रमाण 9 टक्क्यांनी वाढले आहे.
मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील 2 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 125 टक्क्यांनी वाढली आहे. तर 2024 या वर्षात हा स्टॉक आतापर्यंत 26 टक्क्यांनी वाढला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,065.60 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 592.25 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.33 लाख कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.