
Tata Motors Share Price | मागील आठवड्यात शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. सध्या सेन्सेक्स आणि निफ्टी-50 हे दोन्ही इंडेक्स आपल्या उच्चांक पातळीवर पोहचले आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. यामुळे शेअर बाजारात सकारात्मक रॅली पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, सध्या शेअर बाजारात अनेक शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. गुंतवणूकदारांनी या संधीचा फायदा घेतला पाहिजे. म्हणून तज्ञांनी अल्पकालीन गुंतवणूकीसाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. तुम्ही हे शेअर्स खरेदी करून मजबूत नफा कमवू शकता.
TCS :
ब्रोकरेज फर्म Jefferies, Goldman Sachs, JP Morgan ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या संस्थांनी शेअरची टार्गेट प्राइस अनुक्रमे 4615 रुपये, 4470 रुपये, 4600 रुपये निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.40 टक्के घसरणीसह 4,167.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
बजाज ऑटो :
ब्रोकरेज फर्म जेफरीज, नोमुरा ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या संस्थांनी शेअरची टार्गेट प्राइस अनुक्रमे 11630 रुपये आणि 10207 रुपये निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 9,674 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
मारुती :
ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनली, सिटी ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या संस्थांनी शेअरची टार्गेट प्राइस अनुक्रमे 14105 रुपये आणि 15100 रुपये निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 12,648.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
टाटा मोटर्स :
ब्रोकरेज फर्म मॅक्वेरी, जेपी मॉर्गन ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या संस्थांनी शेअरची टार्गेट प्राइस अनुक्रमे 1171 रुपये आणि 1115 रुपये निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 1,024.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
टायटन :
ब्रोकरेज फर्म मॅक्वेरी, गोल्डमन सॅक्स ने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या संस्थांनी शेअरची टार्गेट प्राइस अनुक्रमे 4000 रुपये आणि 3700 रुपये निश्चित केली आहे. आज सोमवार दिनांक 15 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 3,225 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.