
Lotus Chocolate Share Price | लोटस चॉकलेट या मायक्रोकॅप कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजीत आले आहेत. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटसह क्लोज झाला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने जून तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी लोटस चॉकलेट स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 772.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ( लोटस चॉकलेट कंपनी अंश )
लोटस चॉकलेट कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 4700.87 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर मागील तिमाहीच्या तुलनेत या कंपनीच्या महसुल संकलनात 114.7 टक्के वाढ झाली आहे. जून तिमाहीत कंपनीचा सामान्य आणि प्रशासकीय खर्च तिमाही दर तिमाही आधारावर 37.33 टक्के वाढला आहे. आणि वर्ष दर वर्ष आधारे कंपनीचा खर्च 163.96 टक्के वाढला आहे. जून तिमाहीत लोटस चॉकलेट कंपनीचे परिचलन उत्पन्न तिमाही दर तिमाही आधारावर 630.43 टक्के आणि वार्षिक आधारावर 89004.88 टक्के वाढले आहे.
2023 मध्ये रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड कंपनीची FMCG शाखा असलेल्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीने लोटस चॉकलेट कंपनीचे 51 टक्के भाग भांडवल 74 कोटी रुपयेला खरेदी केले होते. या अधिग्रहणानंतर लोटस चॉकलेट कंपनीच्या स्टॉकची किंमत तब्बल 400 टक्क्यांनी वाढली होती. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 108 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.49 टक्के वाढली आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 143 टक्के मजबूत झाली आहे.
मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 4000 टक्के नफा कमावून दिला आहे. मार्च 2001 पासून आतापर्यंत लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सची किंमत 2 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहोचली आहे. याकाळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना एकूण 36,687 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 944.78 कोटी रुपये आहे. लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 747 रुपये होती. आणि नीचांक किंमत पातळी 213 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.