
Infosys Share Price | इन्फोसिस कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी लक्षणीय खरेदी पाहायला मिळाली होती. दिवसाअखेर हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 1,843 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. या कंपनीचे शेअर्स आपल्या जून तिमाहीच्या निकालावर तेजीची प्रतिक्रिया देत आहेत. ( इन्फोसिस कंपनी अंश )
या वर्षी इन्फोसिस कंपनीची कामगिरी सेन्सेक्स इंडेक्सपेक्षा चांगली राहिली आहे. जानेवारी ते 19 जुलै 2024 पर्यंत इन्फोसिस कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र सेन्सेक्स इंडेक्स फक्त 12.69 टक्क्यांनी वाढला आहे. शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी इन्फोसिस स्टॉक 1.78 टक्के वाढीसह 1,789.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
जून तिमाहीत इन्फोसिस कंपनीचे एकत्रित निव्वळ उत्पन्न वार्षिक आधारावर 7.1 टक्क्यांनी वाढून 6,368 कोटी रुपयेवर पोहचले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 5,945 कोटी रुपये कमाई केली होती. या तिमाहीत इन्फोसिस कंपनीचे परिचलन उत्पन्न वार्षिक आधारावर 3.6 टक्क्यांच्या वाढीसह 39,315 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत इन्फोसिस कंपनीचे परिचलन उत्पन्न 37,933 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
इन्फोसिस कंपनीला आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये स्थिर चलन महसुलात 3 ते 4 टक्के वाढ होणे अपेक्षित आहे. तथापि कंपनीने आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये आपला ऑपरेटिंग मार्जिन वाढीचा अंदाज 20 ते 22 टक्क्यांवर राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञाच्या मते, इन्फोसिस स्टॉक पुढील काळात 2,000 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
नुवामा वेल्थ मॅनेजमेंटने फर्मने इन्फोसिस स्टॉकवर 2,050 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तसेच एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने इन्फोसिस स्टॉक 1,900 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. नोमुरा फर्मच्या तज्ञांच्या मते, इन्फोसिस स्टॉकमध्ये अल्पावधीत 1,950 रुपये किमतीवर जाण्याची क्षमता आहे. Nomura फर्मने FY25-26 साठी इन्फोसिस स्टॉकचा EPS अंदाज 2-3 टक्क्यांनी वाढवला आहे. Jefferies फर्मने देखील इन्फोसिस स्टॉकची टारगेट प्राइस वाढवून 2,040 रुपये केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.