 
						GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जोरदार तेजीत वाढत आहेत. त्यामुळे किरकोळ गुंतवणुकदारांना जबरदस्त फायदा होत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर 4.94 टक्क्यांच्या वाढीसह 14.86 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
आज देखील हा स्टॉक किंचित तेजीसह वाढत आहे. या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरचे मूल्य 150 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 14.94 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मागील 10 वर्षात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11,330 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 50.71 टक्के वाढवले आहे. तर मागील 2 वर्षात गुजरात टूलरूम स्टॉकने लोकांना 1239 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात हा स्टॉक 2151 टक्के आणि 5 वर्षात 3438 टक्के वाढला आहे.
गुजरात टूलरूम लिमिटेड ही कंपनी मुख्यतः मेडिकल डिस्पोजेबल फार्मा, फूड आणि बेव्हरेज पॅकेजिंग, लेखन उपकरणे, ओरल स्वच्छतासाठी उच्च दर्जाचे मल्टी कॅविटी मोल्ड तयार करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीने दुबईमध्ये GTL Gems DMCC नावाची उपकंपनी देखील स्थापन केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		