
Bonus Share News | राइट्स लिमिटेड या सरकारी नवरत्न कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पात्र शेअरधारकांना 1:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ( राइट्स लिमिटेड कंपनी अंश )
त्यामुळे हा स्टॉक तेजीत आला आहे. स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली की, कंपनीच्या कॅपिटल रिडेम्पशन रिझर्व्ह आणि फ्री रिझर्व्हमधील जमा रक्कमेपैकी 240.30 कोटी रुपये मूल्याचे 24.03 कोटी बोनस शेअर्स वाटप केले जातील.
या शेअर्सची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. हे बोनस शेअर्स 2 महिन्यांच्या आत शेअरधारकांच्या डीमॅट खात्यात जमा केले जातील. बोनस शेअर्स वाटप केल्यानंतर कंपनीचे शेअर्स कॅपिटल 240 कोटी रुपयेवरून वाढून 480 कोटी रुपये होईल. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी राइट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.22 टक्के वाढीसह 723.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
याशिवाय राइट्स लिमिटेड कंपनीने जून तिमाहीत आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 2.50 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने 2024-25 या आर्थिक वर्षातील जून तिमाहीसाठी प्रति शेअर 2.50 रुपये लाभांश वाटप करण्याच्या रिझोल्यूशनला मंजुरी दिली आहे. लाभांश वाटपाची पात्रता निश्चित करण्यासाठी राइट्स लिमिटेड कंपनीने 8 ऑगस्ट हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.