
Sri Adhikari Brothers Share Price | श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील अनेक दिवसापासून या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहे. या कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून 2 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23,587.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी अंश )
एका वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 1.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 380 रुपये किमतीच्या पार गेला आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 382.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही एका वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3 कोटी रुपयेपेक्षा जास्त झाले असते.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदाराना 715.33 टक्के नफा कमावून दिला आहे. याकाळात हा स्टॉक 43 रुपयेवरून 12,073.79 टक्के वाढला आहे. श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 353.04 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 41.25 रुपये होती.
श्री अधिकारी ब्रदर्स टेलिव्हिजन नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड ही एक भारतीय टेलिव्हिजन नेटवर्क कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. या कंपनीची स्थापना 1994 साली झाली होती. ही कंपनी विविध ब्रॉडकास्टर, एग्रीगेटर्स आणि सॅटेलाइट नेटवर्कसाठी सामग्री उत्पादन आणि सामग्रीचे सिंडिकेशन करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.