
Tata Steel Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा स्टील कंपनीच्या शेअर्समध्ये आज जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. शुक्रवारी देखील या कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण 17,300 कोटी रुपयांचे आकस्मिक दायित्व आहे. ( टाटा स्टील कंपनी अंश )
परिणामी, हा स्टॉक शुक्रवारी 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला होता. तज्ञ मात्र टाटा स्टील स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त करत आहेत. आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी टाटा स्टील स्टॉक 3.46 टक्के घसरणीसह 152.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील आठवड्यात गुरुवारी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 163.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवारी हा स्टॉक 154.60 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसा अखेर हा शेअर 3 टक्क्याच्या घसरणीसह 158.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. 18 जून 2024 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 184.60 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. नोव्हेंबर 2023 मध्ये या कंपनीचे शेअर 114.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.
अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 175 रुपये किमतीवर जाऊ शकतात. अॅक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, भविष्यात केंद्र सरकारकडून एमएमडीआर कायद्यात सुधारणा होऊन मर्यादा लागू करेपर्यंत टाटा स्टील कंपनीचा आकस्मिक दायित्वांचा प्रश्न प्रलंबित राहील. एलारा सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, टाटा स्टील स्टॉक पुढील काळात 171 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 75 टक्के वाढीसह 918.57 कोटी रुपये नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून तिमाहीत टाटा स्टील कंपनीने 524 कोटी रुपये नफा कमावला होता. या कंपनीचे एकूण उत्पन्न 55,031 कोटी रुपये नोंदवले होते आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 60,666.48 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.