
Multibagger Stocks | टाटा समूहाचा भाग असलेल्या ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा लिमिटेड या ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. आज मात्र टाटा मोटर्स आणि ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा या कंपनीची स्थापना टाटा मोटर्स आणि गोवा आर्थिक विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे केली होती. या कंपनीची स्थापना 1980 साली गोव्यात करण्यात आली होती. ( ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी अंश )
आज सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा कंपनीचे शेअर्स 7.23 टक्के घसरणीसह 3,120.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 6.78 टक्के घसरणीसह 1,022.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2024 यावर्षात ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 138.32 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 157 टक्क्यांनी वाढली आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीचे शेअर्स तब्बल 237 टक्के मजबूत झाले आहेत. 2021 पासून आतापर्यंत ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 640 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख रुपये झाले असते. 3 ऑगस्ट 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 473.5 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा मोटर्स कंपनीने ACGL कंपनीचे 48.98 टक्के भागभांडवल धारण केले आहे. एप्रिल-जून 2024 तिमाहीत या कंपनीने 18 कोटी रुपये PAT नोंदवला होता. या कालावधीत कंपनीचा महसूल 34.67 टक्क्यांनी वाढून 203.32 कोटी रुपयेवर पोहचला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.