
Motherson Sumi Wiring Share Price | मदरसन सुमी वायरिंग या ऑटो कंपोनेंट्स बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स ब्रोकरेज हाऊसच्या रडारवर आले आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ( मदरसन सुमी वायरिंग कंपनी अंश )
तज्ञांच्या मते, ग्रीनफिल्ड प्लांट सुरू करण्यासाठी केलेल्या गुंतवणूक खर्चामुळे कंपनीच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. तथापि कंपनीचा आगामी तिमाहींचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी मदरसन सुमी वायरिंग स्टॉक 0.39 टक्के घसरणीसह 71.72 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांच्या मते, मदरसन सुमी वायरिंग कंपनीचे शेअर्स 80 रुपये किमतीवर जाऊ शकतात. 6 ऑगस्ट 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांनी वाढून 70.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 12 टक्क्यांनी वाढू शकतो. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्समध्ये 16 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2024 या वर्षात मदरसन सुमी वायरिंग स्टॉक 15 टक्के वाढला आहे.
जून तिमाहीत मदरसन सुमी वायरिंग कंपनीने EV हायब्रीड्स विभागातून 5 टक्के महसूल संकलित केला आहे. दोन नवीन प्लांट्सवर केलेल्या गुंतवणूक खर्चामुळे कंपनीचा नफा प्रभावित झाला आहे. जून तिमाहीत या कंपनीचा नफा 1.5 अब्ज रुपये आणि EBITDA 2.4 अब्ज रुपये नोंदवला गेला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या महसुलात 17 टक्के वाढ झाली आहे. ब्रोकरेज हाऊसने 2025-26 साठी कंपनीचा EPS अंदाज 6 टक्के वरून कमी करून 5 टक्के केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.