
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. टाटा पॉवर कंपनीने आपले लक्ष स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यावर केंद्रित केले आहे. यासह टाटा पॉवर कंपनी रुफटॉप, इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग आणि एनर्जी मॅनेजमेंट यांसारख्या विभागांमध्ये व्यवसाय विस्तार करत आहे. ( टाटा पॉवर कंपनी अंश )
टाटा पॉवर कंपनीच्या एकूण वीज उत्पादनात अक्षय ऊर्जेचा वाटा 40 टक्के आहे. एकेकाळी टाटा पॉवर कंपनीचा 90 टक्के महसूल B2B विभागातून येत असे. आता कंपनीचा B2B विभागातून मिळणारा महसूल 60:40 झाला आहे.
आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी टाटा पॉवर स्टॉक 2.43 टक्के घसरणीसह 408 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. टाटा पॉवर कंपनीचा पोर्टफोलिओ 14,453 मेगावॅट क्षमतेचा आहे. यामध्ये अक्षय ऊर्जेचा वाटा 40 टक्के आहे. मागील एका वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के नफा कमावून दिला आहे. सध्या टाटा पॉवर कंपनी दिल्ली आणि मुंबईतील वीज वितरण विभागात ग्राहकांशी थेट जोडली गेली आहे. या शहरात कंपनीने रूफटॉप सोलर आणि ईव्ही चार्जिंगसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले आहे.
कंपनीच्या रूफटॉप सोलर ग्राहकांची संख्या 1 लाखांवर पोहचली आहे. पुढील तीन ते चार वर्षांत कंपनीच्या रुफटॉप सोलर ग्राहकांची संख्या 20-25 लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. टाटा पॉवर कंपनीचे भारतात 553 शहरांमध्ये एकूण 5569 ईव्ही चार्जिंग पॉइंट आहेत. टाटा पॉवर कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली आहे की, कंपनीने जी उत्पादने लाँच केली आहेत, त्यांना ग्राहकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपनीच्या उत्पादनांवर ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे. तसेच कंपनीकडे ग्राहकांची उच्च विश्वासार्हता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.