 
						Health Insurance Alert | जीवन आणि आरोग्य विमा योजनांबाबत विमा नियामक संस्था आयआरडीएआयने आपल्या नव्या परिपत्रकात विमा कंपन्यांकडून ग्राहकांच्या हिताशी संबंधित महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
मॅच्युरिटी किंवा सर्वाइव्हल बेनिफिट्सची माहिती
या परिपत्रकात विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) म्हटले आहे की, विमा कंपन्यांनी प्रीमियम देय तारीख आणि पॉलिसी देयकांबद्दल, जसे की मॅच्युरिटी किंवा सर्वाइव्हल बेनिफिट्सची माहिती देय तारखेच्या किमान एक महिना अगोदर पाठविणे अपेक्षित आहे.
तर ग्राहक लोकपालाकडे जाऊ शकतात :
नियामकाने (IRDAI) म्हटले आहे की, जर कंपन्या डेडलाइन पूर्ण करण्यात अपयशी ठरल्या तर ग्राहक लोकपालाकडे जाऊ शकतात. याशिवाय आरोग्य विम्यात कॅशलेस सेटलमेंट आणि फ्री लुक पीरियडसंदर्भातही आयआरडीएआयने विमा कंपन्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत.
फ्री लुक पीरियड वाढवला
आयआरडीएआयने (IRDAI) म्हटले आहे की, विमा कंपन्यांनी जीवन आणि आरोग्य विमा पॉलिसीसाठी 30 दिवसांचा फ्री-लुक पीरियड द्यावा. तसेच फ्री-लुक कॅन्सलेशन केल्यास ग्राहकांनी प्रीमियमची रक्कम 7 दिवसांच्या आत परत करावी. याशिवाय पॉलिसी लोनशी संबंधित सेवा आणि मूळ पॉलिसी अटींमध्ये बदल देखील सात दिवसांच्या मुदतीत करावेत.
हेल्थ इन्शुरन्स – कॅशलेस क्लेम सेटलमेंट 3 तासात
आरोग्य विम्याच्या बाबतीत कॅशलेस क्लेम 3 तासांच्या आत आणि नॉन कॅशलेस क्लेम 15 दिवसांच्या आत निकाली काढावा, असा पुनरुच्चार नियामकाने केला आहे. याशिवाय आयआरडीएआयने मास्टर सर्कुलरमध्ये विमा कराराच्या विविध टप्प्यांमध्ये आवश्यक माहिती देणे आणि पॉलिसी तपशीलांसह अनिवार्य ग्राहक माहिती पत्रकाचा समावेश करण्यास सांगितले आहे. विमा कंपन्यांना प्रादेशिक भाषांमध्ये प्रस्ताव फॉर्म सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		