 
						NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये आज प्रचंड घसरण पाहायला मिळाली आहे. नुकताच या कंपनीला 101 कोटी रुपये मूल्याची (NSE: NBCC) नवीन ऑर्डर मिळाली होती. त्यानंतर 30 सप्टेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांनी वाढले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 32,130 कोटी रुपये आहे. (एनबीसीसी इंडिया कंपनी अंश)
एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 209.75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.86 रुपये होती. आज गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी एनबीसीसी इंडिया स्टॉक 5.24 टक्के घसरणीसह 170.74 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
कंपनीला मिळालेल्या ऑर्डर्सचा तपशील
नुकताच एनबीसीसी इंडिया कंपनीला भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून 101 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे अतिरिक्त पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी 75 कोटी रुपये मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता. यापूर्वी एनबीसीसी इंडिया कंपनीची उपकंपनी HSCC इंडियाला दरभंगा बिहार येथे AIIMS रूग्णालय स्थापन करण्यासाठी 1261 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली होती. HSCC इंडिया लिमिटेड ही एनबीसीसी इंडिया कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे.
मागील 4 वर्षात 630% परतावा दिला
मागील 4 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 630 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 4 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. गेल्या 6 महिन्यांत एनबीसीसी इंडिया या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 44 टक्के वाढविले आहेत. 2024 या वर्षात एनबीसीसी इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 119 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात हा स्टॉक 208 टक्के, आणि 4 वर्षात 630 टक्के वाढला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		