3 May 2025 4:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Vodafone Idea Share Price | ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनकडून रेटिंग अपडेट, हा पेनी स्टॉक BUY करावा की Sell - Marathi News

Highlights:

  • Vodafone Idea Share PriceNSE: IDEA – व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश
  • ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन – रेटिंग अपडेट
  • तज्ज्ञांनी काय म्हटले
  • शेअर प्राईस FPO किमतीच्या खाली घसरले
Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | भारतातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचा शेअर गुरुवारी (NSE: IDEA) फोकसमध्ये आलं आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.54 टक्के वाढून 9.24 रुपयांवर ट्रेड करत होता. दरम्यान, गेल्या सत्रात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने ९.५५ रुपयांचा उच्चांक गाठला होता. दुसरीकडे इंट्राडेचा नीचांकी स्तर ९.०४ रुपये होता. व्होडाफोन आयडिया शेअरचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर 19.18 रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 8.90 रुपये होता. (व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी अंश)

ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गन – रेटिंग अपडेट
प्रसिद्ध जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया लिमिटेड या टेलीकॉम कंपनीच्या शेअर्सची रेटिंग अपडेट केली आहे. आता या शेअरला “अंडरवेट” रेटिंगवरून “न्यूट्रल” रेटिंग देण्यात आली आहे. तसेच या पेनी शेअरची टार्गेट प्राईस ७ रुपयांवरून १० रुपयांपर्यंत वाढवली आहे. विशेष म्हणजे अपडेटेड टार्गेट प्राईस सुद्धा कंपनीच्या 11 रुपयांच्या FPO प्राईसपेक्षा कमी आहे.

तज्ज्ञांनी काय म्हटले
दरम्यान, व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी २०२६ आणि २०२७ या आर्थिक वर्षात थकबाकी भरण्यास सक्षम असेल, परंतु २०२८ या आर्थिक वर्षात ती कमी पडेल, असे जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने नोट मध्ये म्हटले आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरवर कव्हरेज असलेल्या २२ विश्लेषकांपैकी १४ विश्लेषकांनी शेअरवर ‘SELL’ रेटिंग दिली आहे, तर प्रत्येकी चार विश्लेषकांनी शेअरवर ‘BUY’ आणि ‘HOLD’ रेटिंगची शिफारस केली आहे.

शेअर प्राईस FPO किमतीच्या खाली घसरले
दरम्यान, एजीआर थकबाकीसंदर्भात दूरसंचार कंपन्यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स त्यांच्या एफपीओ किमतीच्या खाली घसरले होते. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीची सध्याची एजीआर थकबाकी ७०,३०० कोटी रुपयांहून अधिक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vodafone Idea Share Price 10 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या