
Tata Technologies Share Price | गुरुवार १० ऑक्टोबर 2024 रोजी टाटा गृपचा टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा (NSE:TATATECH) शेअर तेजीत आल्याचं पाहायला मिळालं. गुरुवारी सकाळी हा शेअर 4 टक्क्यांनी वधारून १,०८९ रुपयांवर पोहोचला होता, परंतु स्टॉक मार्केटच्या क्लोजिंग बेल वेळी 1.65% वाढून 1,066 रुपयांवर बंद झाला. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा शेअरमध्ये सलग दोन दिवस तेजी दिसून आली आहे. (टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी अंश)
ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
प्रसिद्ध Axis कॅपिटल ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला दिला आहे, किंवा गुंतवणूकदारांनी त्यांच्या ‘पोर्टफोलिओ’मधून काही शेअर्स कमी करावेत असा सल्ला दिला आहे. Axis कॅपिटल ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरची ‘SELL’ रेटिंग जाहीर करताना 950 रुपये ही टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. म्हणजे सध्याच्या पातळीपेक्षा शेअर प्राईस 13 टक्क्याने घसरू शकते, असा अंदाज ब्रोकरेजने व्यक्त केला आहे. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा शेअर या वर्षी आतापर्यंत जवळपास 10 टक्क्यांनी घसरला आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.92 टक्के घसरून 1,054.90 रुपयांवर पोहोचला होता.
ब्रोकरेज फर्मने आपल्या नोट मध्ये म्हटले?
दरम्यान, Axis कॅपिटल ब्रोकरेज फर्मने सांगितले की, विनफास्टशी संबंधित अडचणी कमी झाल्या आहेत. परंतु त्यानंतर देखील कंपनीला कोणताही दिलासा मिळालेला दिसत नाही. Axis कॅपिटल ब्रोकरेज फर्मने आपल्या नोट मध्ये म्हटले आहे की, ‘आर्थिक वर्ष 2022 ते वित्त वर्ष 2023 दरम्यान कंपनीची क्लाइंट-कॉन्सन्स्ट्रेशन’मध्ये कमतरता आली होती, परंतु आता आर्थिक वर्ष 2025 पासून ती वाढण्याचा अंदाज आहे, असं Axis कॅपिटल ब्रोकरेज फर्मने आपल्या नोट नमूद केले आहे.
शेअरची कामगिरी कशी आहे
Axis कॅपिटल ब्रोकरेज फर्मने सांगितले की, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने यावर्षी नकारात्मक कामगिरी केली आहे. मात्र असं असून देखील कंपनीचे मूल्यांकन उच्च पातळीवर आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीला पहिल्या तिमाहीत 162.03 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 15.4 टक्क्यांनी कमी होता. परंतु, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या तिमाही आधारावर नफ्यात किंचित वाढ झाली आहे असं आकडेवारी सांगते.
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे उत्पन्न 1,268.97 कोटी रुपये होते, जे मागील वर्षी याच तिमाहीतील 1,257.53 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा जास्त आहे असं आकडेवारी सांगते. मात्र, त्यात तिमाही आधारावर २.४६% इतकी घसरण नोंदविण्यात आली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.