
NHPC Share Price | केंद्र सरकार रिन्यूएबल एनर्जी क्षमता विस्ताराबाबत विशेष रणनीती आखत आहे. या सेक्टरमध्ये जलविद्युत वाढीसाठी (NSE: NHPC) मोठे प्रयत्न सुरु आहेत. या सेक्टरमध्ये कार्यरत असलेली एनएचपीसी ही एकमेव PSU कंपनी आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनीची हायड्रो-इलेक्ट्रिसिटी क्षमता 7 गिगावॅट आहे. ही क्षमता देशाच्या एकूण जलविद्युत क्षमतेच्या 15% आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
हा शेअर मल्टिबॅगर परतावा देऊ शकतो
एनएचपीसी लिमिटेड कंपनीची एकूण हायड्रो-इलेक्ट्रिसिटी क्षमता मोठी असल्याने ब्रोकरेज फर्म या कंपनी शेअरवर उत्साही आहेत. NHPC कंपनीचा शेअर मल्टिबॅगर परतावा देऊ शकतो असा तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.15 टक्के वाढून 91.06 रुपयांवर पोहोचला होता.
NHPC कंपनीची क्षमता 3 पटीने वाढणार
वेंचुरा सिक्युरिटीज फर्मने NHPC लिमिटेड कंपनी शेअरबाबत सविस्तर रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये NHPC लिमिटेड कंपनीच्या क्षमतेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, NHPC लिमिटेड कंपनीची सध्या असलेली ७ गिगावॅट जलविद्युत क्षमता आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत १२ गिगावॅटपर्यंत पोहोचेल. यामुळे NHPC लिमिटेड कंपनीचा मार्केट शेअर 20 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. NHPC लिमिटेड कंपनीकडून सध्या ८.३ गिगावॅट क्षमतेचे सर्वेक्षण सुरू आहे. त्या मंजुरीनंतर NHPC कंपनीची एकूण क्षमता ३ पटीने वाढून २४.६ गिगावॅट होईल असं वेंचुरा सिक्युरिटीज फर्मच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
NHPC शेअरची टार्गेट प्राईस
NHPC शेअरसाठी तज्ज्ञांकडून ‘BUY’ रेटिंग जाहीर करण्यात आली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी एनएचपीसी शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी 176 रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. या टार्गेटसाठी 24 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. NHPC शेअर सध्याच्या पातळीपेक्षा ९५ टक्क्यांनी वाढेल असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
शेअरने 2 वर्षांत 140% परतावा दिला
एनएचपीसीचा शेअरने 15 जुलै रोजी 118 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मागील एका महिन्यात या शेअरने 4 टक्के परतावा दिला आहे. मागील तीन महिन्यात या शेअरने 20% परतावा दिला आहे. तर 2024 या वर्षात आतापर्यंत 37% परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या शेअरने 73% परतावा दिला आहे. मागील दोन वर्षांत या शेअरने 140% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.