3 May 2025 9:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Horoscope Today | आजचे राशी भविष्य, गुरुपुष्यामृताचा लाभ होईल तर; काही व्यक्तींना गुंतवणुकीवर चांगला नफा मिळेल

Horoscope Today

Horoscope Today | आजच्या पंचांगा विषयी सांगायचे झाले तर, आजचे पंचांग वार गुरुवार, 24 ऑक्टोबर 2024, अश्विन कृष्णपक्ष त्याचबरोबर कराष्टमी आणि गुरुपुष्यामृताचा लाभ काही व्यक्तींना होऊ शकतो. आज बऱ्याच व्यक्तींच्या आयुष्यात धनलाभाचा योग लिहिला गेला आहे.

मेष रास :
आज मेष राशींच्या भविष्यामध्ये प्रॉपर्टी निगडित गोष्टी घडण्याचा योग चालून आला आहे. त्याचबरोबर बांधकामाधीन प्रकल्पांची कामे पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे. त्याचबरोबर आत्ता दिवस उत्तम आणि फलदायी आहे.

वृषभ रास :
वृषभ राशीच्या व्यक्तींना हलकासा सर्दी खोकला जाणवू शकतो त्याचबरोबर डोकेदुखीचा ही त्रास सतावू शकतो. अनेक वर्षांपासून अडलेल्या गोष्टी पूर्ण होतील. भावंडांचे सहकार्य लाभले.

मिथुन रास :
मिथुन राशींच्या व्यक्तीच्या आयुष्यात आज सोन खरेदीचा योग चालून येणार आहे. त्याचबरोबर गुरुपुष्यामृताचा लाभ देखील मिथुन राशींना प्राप्त होऊ शकतो.

कर्क रास :
कर्क राशींच्या महिलांसाठी आणि लहान बालकांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी, उत्साहित आणि आनंदाचा असणार आहे. दिवसभर आता सर्व सकारात्मक गोष्टी घडतील आणि दिवस चांगला जाईल.

सिंह रास :
आज ठरवून ठेवलेल्या गोष्टी फीसकण्याची शक्यता आहे. दिवसभरात अनोळखी व्यक्तीशी बराच वेळ संवाद होण्याची देखील शक्यता आहे. आजचा दिवस थोडा चिडचिडीमध्ये जाऊ शकतो तरीसुद्धा मनस्ताप करून न घेता शांतपणे राहायचं आहे.

कन्या रास :
कन्या राशींच्या व्यक्तींचा आजचा दिवस अत्यंत आनंदात जाणार आहे. बॉसकडून तुमचे विशेष कौतुक होईल त्याचबरोबर प्रमोशन वाढीची गोड बातमी देखील कानावर पडेल.

तुळ रास :
तूळ राशींच्या महिलांसाठी तसेच पुरुषांसाठी आजचा दिवस अत्यंत फलदायी असेल. आरोग्य सुदृढ असेल त्याचबरोबर नवीन कामांच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे आणि गुरुपुष्यामृताचा लाभ देखील होईल.

वृश्चिक रास :
वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आहे. आजच्या दिवशी तुमचे भाग्य उजळू शकते. त्याचबरोबर गुरुपुष्यामृताचा लाभ होईल आणि आज तुमच्या घरात एखादी मौल्यवान वस्तू येईल.

धनु रास :
धनु राशींच्या व्यक्तींना आज थेट जोडीदाराकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर आज बाहेर फिरायला आणि खायला जाऊ शकता. त्याचबरोबर आजचा दिवस अत्यंत आनंदमय असून तुमच्या भविष्यात दानधर्माचा योग देखील आहे.

मकर रास :
आज शुल्लक कारणांमुळे जोडीदारासह खटके उडण्याची शक्यता आहे. तरीसुद्धा तुम्हाला डोकं शांत ठेवून वावरायचं आहे. त्याचबरोबर आजचा दिवस आनंदात आणि प्रसन्नमय जाईल. बालपणीची मैत्रीण भेटण्याचा योग आहे.

कुंभ रास :
कुंभ राशीच्या व्यक्तींना आज आजीकडून विशेष प्रेम आणि कौतुक मिळेल. आज तब्येत थोडी नरम असेल. तब्येतीमुळे बाहेरचे प्लॅन कॅन्सल होऊ शकतात.

मीन रास :
मीन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अतिशय रोमँटिक आणि प्रेमाने परिपूर्ण असणार आहे. जोडीदाराचं चांगलं सहकार्य लाभेल. आज केवळ एकमेकांसाठी जगाल. त्याचबरोबर दिवस अत्यंत उत्साहात आणि आनंदात जाईल.

Latest Marathi News | Horoscope Today 24 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Horoscope Today(933)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या