
Vedanta Share Price | शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ६६२.८७ अंकांनी घसरून ७९,४०२.२९ वर बंद झाला (NSE: VEDL) होता. तर NSE निफ्टी 218.60 अंकांनी घसरून 24,180.80 अंकांवर बंद झाला होता. (वेदांता लिमिटेड कंपनी अंश)
वेदांता शेअरची स्थिती
शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी वेदांता लिमिटेड कंपनी शेअर 2.78 टक्के घसरून 456 रुपयांवर पोहोचला होता. वेदांता लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चपातळी 523.65 रुपये आहे, तर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 211.20 रुपये आहे. वेदांता लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,78,079 कोटी रुपये आहे.
तज्ज्ञांनी सल्ला दिला
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी ईटी नाऊला वेदांता लिमिटेड कंपनी शेअर संदर्भात महत्वाचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, ‘वेदांता लिमिटेड कंपनी शेअरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून तयार होत असलेली सपोर्ट लेव्हल शुक्रवारी तुटली आहे. या शेअरमध्ये निगेटिव्ह कँडल तयार होत आहे. त्यामुळे ही एक छोटी संधीही आहे. तज्ज्ञांनी पुढे म्हटले की, ‘या शेअरमध्ये 449 पर्यंत नकारात्मक ट्रेंड आहे. जर वेदांता लिमिटेड कंपनी शेअरने ४४९ रुपयांची पातळी ओलांडली तर हा शेअर ४३८ रुपयांपर्यंत घसरू शकतो.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात वेदांता लिमिटेड कंपनी शेअर 9.12% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 14.99% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 114.84% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात 220.68% परतावा दिला आहे. YTD आधारावर शेअरने 77.33% परतावा दिला आहे.
वेदांता लिमिटेड लाभांश इतिहास
वेदांता लिमिटेड कंपनीचा डिव्हीडंड देण्याचा मोठा रेकॉर्ड आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत वेंदाता लिमिटेड कंपनीने ३ वेळा डिव्हिडंड दिला आहे. वेंदाता लिमिटेड कंपनीने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात १२.५० रुपये, एप्रिल महिन्यात २०.५० रुपये, मे महिन्यात १८.५० रुपये आणि डिसेंबर महिन्यात ११ रुपये डिव्हिडंड दिला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.