
BEL Share Price | मंगळवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र अनेक कंपन्यांचे शेअर्स मंगळवारी (NSE: BEL) वधारले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअर सुद्धा तेजीत होता. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी हा शेअर 4.89 टक्के वाढून 283.25 रुपयांवर पोहोचला होता. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
दुसऱ्या तिमाहीचे निकाल
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसात अनेक डिफेन्स कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. दरम्यान, यूबीएस ब्रोकरेज फर्मने BEL शेअर्सबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. यूबीएस ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी टार्गेट प्राईस देताना ‘न्यूट्रल’ रेटिंग सुद्धा दिली आहे.
यूबीएस ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
यूबीएस ब्रोकरेज फर्मने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये वाढ केली आहे, ज्यामुळे शेअरची रेटिंग वाढली आहे. तसेच ग्रॉस मार्जिन गाईडन्स 42 टक्क्यांवर कायम आहे. यूबीएस ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार, संरक्षण प्रकल्पांवरील कराराच्या अटींमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही. मात्र सकारात्मक संकेता सह नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये वाढ होण्याची शक्यता मर्यादित आहे. यामुळे यूबीएस ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी ‘न्यूट्रल’ रेटिंग दिली आहे. तसरच ३२० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
आर्थिक वर्ष 2025 तिमाही निकाल
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने गेल्या आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी ही पब्लिक सेक्टर डिफेन्स क्षेत्रातील मोठी कंपनी आहे आणि या कंपनीचा निव्वळ नफा ३८ टक्क्यांनी वाढून १,०९२.४५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
मल्टिबॅगर परतावा दिला
मागील ६ महिन्यात या शेअरने 20.33% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 114.66% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 605.83% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 53.15% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.