
Patel Engineering Share Price | पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने बुधवारी माहिती देताना सांगितले की, नॉन-कोर मालमत्ता ऑफलोड करण्याच्या धोरणाचा भाग म्हणून पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने (NSE: PATELENG) वेलस्पन मिशिगन इंजिनियर्स लिमिटेडमधील उर्वरित 9.99% इक्विटी भागभांडवल विकले आहे. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने हे भागभांडवल 100 कोटी रुपयांना विकले आहे. (पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीने निवेदन दिले
पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने निवेदनात म्हटले की, ‘संबंधित करार यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या विक्रीतून पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीला उत्पन्न मिळाले आहे. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनी निवेदनानुसार, ही डिसइन्वेस्टमेन्ट पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या रोख प्रवाहात महत्त्वपूर्ण योगदान देईल, ज्यामुळे कंपनीच्या धोरणात्मक प्राधान्यांना सपोर्ट देण्यासाठी ऍडिशनल आर्थिक बळ मिळेल.
कंपनीचा ताळेबंद मजबूत होणार
या उत्पन्नाचा वापर केल्यास पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचा ताळेबंद मजबूत होईल. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, प्रमुख क्षेत्रांमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करून, ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवणे, बाजारातील उपस्थिती वाढवणे आणि नावीन्य आणणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच अधिक अपडेटनुसार, वेलस्पन मिशिगन इंजिनियर्स लिमिटेड कंपनी मधील भागभांडवल वेलस्पन एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीने विकत घेतले होते.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
गुरुवार 31 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.16 टक्के वाढून 50.90 रुपयांवर पोहोचला होता. मागील ६ महिन्यात हा शेअर 11.63% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 5.17% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 265.40% परतावा दिला आहे. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च किंमत 79 रुपये आणि 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 46.10 रुपये आहे. पटेल इंजिनियरिंग लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 4,378 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.