 
						Mutual Fund SIP | समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला तुमची गुंतवण एक कोटी रुपयांपर्यंत जमा करायची आहे. आता करोडोची रक्कम म्हटल्यावर सहजासहजी जमा होणार नाही. यासाठी तुम्हाला नक्कीच दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करावी लागेल. परंतु तुम्ही एक सोपा फॉर्मुला वापरून आणि शाहीर पद्धतीने गुंतवणुकीचा विचार करून लवकरात लवकर एक करोड रुपयांचा फंड तयार करू शकता.
15-15-15 : 
करोडोंचा फंड तयार करण्यासाठी तुम्हाला 15, 15 आणि 15 या फॉर्मुल्याचा वापर करावा लागेल. यासाठी तुम्हाला ग्रोथ रेट सारख्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. सुरुवातीला तुम्हाला स्टॉक मार्केट वॉलेटाईल वाटू शकते. परंतु मागील काही ट्रेंड्स पाहता वेळेमध्येच तुमची गुंतवणूक वरच्या थराला जाते. दरम्यान इक्विटी मार्केटमध्ये 15% वार्षिक दरानुसार परतावा मिळणे कठीण वाटू शकते परंतु दीर्घकाळासाठी 15% वार्षिक रिटर्न बनवणे शक्य असू शकते.
15, 15 आणि 15 या फॉर्मुल्याचा सिद्धांत समजून घेऊया :
गुंतवणुकीचा फॉर्मुल्यामध्ये 15 हा क्रमांक तीन वेळा येतो. 15, 15 आणि 15 म्हणजे ग्रोथ रेट, मंथली सेविंग अमाऊंट आणि इन्वेस्टमेंट ड्युरेशन. समजा तुम्ही एकूण 15 वर्षांच्या कार्यकाळात 15% वार्षिक रिटर्न मिळवून बाजी मारत असाल आणि न चुकता सातत्याने प्रत्येक महिन्याला 15,000 हजार रुपयांची गुंतवणूक करत असाल तरच आणि तरच तुमच्या खात्यात 1 कोटी रुपयांची रक्कम जमा होईल.
या तीन स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या :
1. अनुमानित फंड : 1 करोड रुपये
2. तुम्ही 15 वर्षासाठी केलेली एकूण गुंतवणूक : 27 लाख रुपये
3. तुम्हाला होणारा एकूण फायदा : 73 लाख रुपये
फॉर्मुल्याचे फायदे आहेत तरी काय :
म्युच्युअल फंडाच्या या 15, 15, 15 चे बरेच फायदे तुम्हाला अनुभवता येतील. यामध्ये सर्वात मोठे 2 प्रकारचे फायदे अनुभवता येतील. सर्वात पहिला फायदा म्हणजेच सिस्टिमॅटिक प्लॅन ज्याला आपण एसआयपी असं देखील म्हणतो. दुसरा फायदा म्हणजे गुंतवणूकदाराला होणारा कंपाऊंडिंगचा फायदा. यांसारखे अनेक फायदे गुंतवणूकदारा अनुभवता येतील.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		