RVNL Share Price | मंगळवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर 1.57 टक्क्यांनी वाढून 443.40 रुपयांवर (NSE: RVNL) पोहोचला होता. सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग बंद झाल्यानंतर या कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली होती. त्यामुळे मंगळवार शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होईल असे संकेत मिळाले होते. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
कंपनीला 294.95 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला
रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘रेल विकास निगम लिमिटेड कंपनी दक्षिण मध्य रेल्वेकडून ट्रॅक दुहेर करण्यासाठी अभियांत्रिकी बांधकाम करारासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. हा कॉन्ट्रॅक्ट 294.95 कोटी रुपयाचा आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट 24 महिन्यांत पूर्ण करावा लागणार आहे.
यापूर्वी 5 नोव्हेंबर रोजी पूर्व रेल्वेकडून एका प्रकल्पासाठी रेल विकास निगम लिमिटेड कंपनी L1 बोली लावणारी कंपनी ठरली होती. हा संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट 837,67,19,698.44 रुपयांचा आहे. हा प्रकल्प RVNL कंपनीला 36 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. हा प्रकल्प RVNL-SCPL यांचा संयुक्त उपक्रम आहे. या संयुक्त उपक्रमात रेल विकास निगम लिमिटेड कंपनीची 74% आणि SCPL ची 26% भागीदारी आहे. तसेच, 4 नोव्हेंबर रोजी, RVL प्रकल्पासाठी 625,08,34,774.95 रुपयांची L1 बोली लावणारी कंपनी ठरली होती. RVNL ला मिळालेला हा कॉन्ट्रॅक्ट दक्षिण मध्य रेल्वेचा आहे.
एका वर्षात 180 टक्क्यांचा परतावा
मागील 6 महिन्यांत RVNL शेअरने 67% परतावा दिला आहे. तसेच २०२४ मध्ये आतापर्यंत 140 टक्के परतावा दिला आहे. मागील १ वर्षात RVNL शेअरने 180 टक्के परतावा दिला आहे. मागील २ वर्षांत या शेअरने 754% परतावा दिला आहे. मागील 3 वर्षांत RVNL शेअरने 1034% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.