
Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला. दुसऱ्या तिमाही निकालानंतर स्टॉक मार्केट तज्ज्ञ टाटा स्टील (NSE: TATASTEEL) शेअर्सवर लक्ष ठेवून आहेत. ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. बुधवार 13 ऑक्टोबर रोजी हा शेअर 2.53 टक्के घसरून 140.52 रुपयांवर पोहोचला होता. (टाटा स्टील लिमिटेड कंपनी अंश)
दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत टाटा स्टील लिमिटेड कंपनीला 758.84 कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. टाटा स्टील लिमिटेड कंपनीने खर्च कमी केल्याने कंपनी नफ्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षातील जुलै-सप्टेंबर या तिमाहीत टाटा स्टील लिमिटेड कंपनीला 6,511.16 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. समीक्षाधीन कालावधीत टाटा स्टील लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न 54,503.30 कोटी रुपयांवर घसरले, जे मागील वर्षी याच कालावधीत 55,910.16 कोटी रुपये होते. टाटा स्टील लिमिटेडचा खर्च वार्षिक आधारावर 55,853.35 कोटी रुपयांवरून 52,331.58 कोटी रुपयांवर घसरला आहे.
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राईस
जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअर्सवर खरेदीचा सल्ला दिला आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील शेअरला ओव्हरवेट रेटिंग दिली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मने या शेअरसाठी 180 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. जेपी मॉर्गन ब्रोकरेज फर्मच्या मते गुंतवणूकदारांना 22 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.
शेअरने 256% परतावा दिला
टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी किंमत 184.60 रुपये आणि नीचांकी किंमत 118.55 रुपये होती. मागील ५ दिवसांत शेअरमध्ये 9.63% घसरण झाली आहे. तसेच मागील १ महिन्यात शेअर 11.24% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 16.13% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात शेअरने 256.20% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.