
HAL Share Price | गुरुवार 14 ऑक्टोबरला सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये घसरण पाहायला मिळाली. गुरुवार 14 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 0.85 टक्के वाढून 4,101.50 रुपयांवर (NSE: HAL) पोहोचला होता. मागील १ महिन्यात हा शेअर 9.01% घसरला आहे. मात्र आता या शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनी अंश)
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचा नफा २२ टक्क्यांनी वाढून १,५१० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १,२३७ कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचे उत्पन्न ६ टक्क्यांनी वाढून ५,९७६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसऱ्या तिमाहीत हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीचा नफा ऑफर टॅक्स (PAT) पहिल्या तिमाहीतील 1,437 कोटी रुपयांच्या तुलनेत 5 टक्क्यांनी अधिक आहे.
शेअर रेटिंग आणि टार्गेट प्राईस
ईटी-नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी सांगितले की, ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरमध्ये आधीच ब्रेकआऊट झाला आहे. शेअरचे दैनंदिन स्ट्रक्चर पाहिल्यास शेअरचा २०० EMA शेअरला चांगला सपोर्ट देत आहे. शेअरच्या त्या पातळीवरून तेजी सातत्याने दिसून येत आहे. मागील २ दिवसांच्या ट्रेडिंग सेशन्सची तुलना केल्यास गेल्या तीन सत्रांमध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने शॉर्ट टर्म २० आणि ५० ईएमएच्या वर ट्रेड केला आहे असं तज्ज्ञ म्हणाले.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर ‘HOLD’ करावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कारण या शेअरमध्ये पुन्हा तेजी दिसून येईल. जर गुंतवणूकदारांनी हा शेअर पुढील 3-4 महिने HOLD केल्यास तो 5000 रुपयांपर्यंत वाढू शकतो. यासाठी गुंतवणूकदारांनी 4120 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असा सल्ला देखील तज्ज्ञांनी दिला आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअर 9.01% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 0.66% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात शेअरने 96.15% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 919.89% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना हिंदुस्थान एरोनॉटिक्स शेअरने 624.11% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर शेअरने 45.12% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.