 
						Vodafone Idea Share Price | मागील १ वर्षात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 48 टक्क्यांहून अधिक घसरला आहे, तर स्टॉक मार्केट निफ्टी-५० या कालावधीत २४ टक्क्यांनी (NSE: IDEA) वधारला आहे. सोमवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.50 टक्के घसरून 7.23 रुपयांवर पोहोचला होता. या वर्षी जूनमध्ये व्होडाफोन आयडिया शेअरने १८.५२ रुपयांचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र आता टॉप ब्रोकरेज फर्मने शेअरबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
नोमुरा ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
व्होडाफोन आयडिया शेअर्स १० रुपयांहून अधिक वाढण्याचे संकेत मिळाले आहेत. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरवर टॉप ब्रोकरेज फर्म सुद्धा सकारात्मक संकेत देत आहेत. नोमुरा ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. व्होडाफोन आयडिया शेअरबाबत खरेदीचा सल्ला देताना नोमुरा ब्रोकरेज फर्मने १४ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
सिटी रिसर्च ब्रोकरेज फर्म – ‘BUY’ रेटिंग
सिटी रिसर्च ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. सिटी रिसर्च ब्रोकरेज फर्मने व्होडाफोन आयडिया शेअरसाठी १३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने १४ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले. व्होडाफोन आयडिया कंपनीचा तोटा वार्षिक आधारावर कमी झाला आहे. तसेच, प्रति युझर एव्हरेज रेव्हेन्यू (ARPU) वाढला आहे. व्होडाफोन आयडियाकंपनीच्या एकूण ग्राहकांची संख्या 20.5 दशलक्ष आहे असं सिटी रिसर्च ब्रोकरेज फर्मने म्हंटल आहे.
आर्थिक वर्ष २०२७ पासून व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या ग्राहकसंख्येत वाढ सुरू होईल, असा अंदाज नोमुरा ब्रोकरेज फर्मने वर्तवला आहे. व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या 4G नेटवर्कची व्याप्ती वाढवत आहे. तसेच 5G सेवेतही व्होडाफोन आयडिया गुंतवणूक करत आहे.
नोमुरा ब्रोकरेज फर्मने आर्थिक वर्ष २०२४ ते २०२७ दरम्यान EBIDTA चा CAGR १४% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीने दरवाढ केली आहे. त्याचा परिणाम व्होडाफोन आयडिया कंपनीच्या महसुलात दिसण्यास थोडा वेळ लागेल, असे नोमुरा ब्रोकरेज फर्मचे मत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		