
SBI Mutual Fund | मागील काही वर्षांमध्ये काही धमाकेदार म्युच्युअल फंडाने धमाकेदार रिटर्न मिळवून दिला आहे. या 5 म्युच्युअल फंडाने 10 हजार रुपयांच्या SIP मधून 1.35 कोटी रुपयाची रक्कम मिळवून दिली आहे. व्हॅल्यू रिसर्च रिपोर्टमध्ये दर्शवल्याप्रमाणे 5 म्युच्युअल फंडाने मागील 15 वर्ष पूर्ण करून एवढ्या दिवसांत गुंतवणूकदारांना घट घोषित परतावा मिळवून दिला आहे. चला तर जाणून घेऊया या 5 धमाकेदार स्मॉल कॅप फंडांविषयी.
1. SBI स्मॉल कॅप फंड :
रिपोर्टनुसार एसबीआयच्या स्मॉल कॅप फंडाने मागील 15 वर्षांमध्ये 24.03% एवढा घसघशीत परतावा मिळवून दिला आहे. यामध्ये महिन्याला 10000 हजारांची एसआयपी केल्यानंतर 1.35 करोड रुपयांचा मोठा फंड तयार केला आहे.
2. कोटक स्मॉल कॅप फंड :
कोटक स्मॉल कॅप फंडाने 15 वर्षांत 10 हजारांच्या एसआयपीतून 21.52% परतावा (XIRR) मिळवून दिला आहे. या फंडाने 10 हजाराच्या एसआयपीतून 1.08 करोडोंचा फंड तयार केला आहे.
3. क्वांट स्मॉल कॅप फंड :
या फंडाने देखील जास्तीत जास्त रिटर्न मिळवून दिला आहे. या म्युच्युअल फंडाने 21.71% परतावा मिळवला आहे. या फंडाने 15 वर्षांत 10 हजाराच्या महिन्याच्या एसआयपीतून 1.10 कोटी रक्कम जोडली आहे.
4. फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड :
या धमाकेदार फंडाने 21.97% परतावा मिळवला आहे. 15 वर्षांत 10 हजार प्रति महा एसआयपीने 1.13 करोडोची रक्कम जमा केली आहे.
5. DSP स्मॉल कॅप फंड :
DSP ने 22.33% रिटर्न्स मिळवून दिले आहेत. त्याचबरोबर 15 वर्षांत 10 हजार महिना एसआयपीतून 1.16 करोडोंची रक्कम मिळवून दिली आहे.
रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार या सर्व प्रकारच्या फंडांमध्ये प्रचंड प्रमाणात जोखीम उचलावी लागते. कारण की हे सर्व म्युच्युअल फंड शेअर बाजारातील मूल्यावर आधारित असते. त्यामुळे ज्या व्यक्तींना पैसे गमावण्याची भीती किंवा रिस्क घ्यायची नसेल त्यांनी या फंडामध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करू नये. परंतु ज्या व्यक्तींना रिस्क घेऊन कोटींचे मालक बनायचे असेल त्यांनी या फंडाचा भाग आवर्जून व्हावा.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.