
SBI Mutual Fund | बाजारातील विविध गुंतवणुकीच्या साधनांपैकी म्युच्युअल फंड आणि एसआयपी म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा लोकांसाठी लोकप्रिय गुंतवणुकीचा पर्यायबनला आहे. कारण की SIP तुम्हाला चांगल्या गुंतवणुकीची सांगड घालून देते.
यामध्ये तुम्ही केवळ 100 ते 200 त्याचबरोबर 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये तुम्ही चक्रवाढ व्याजाबरोबर गुंतवणूक देखील वाढवू शकता. आज आम्ही तुम्हाला एसबीआयच्या हेल्थकेअर या जबरदस्त फंडाविषयी माहिती सांगणार आहोत. या जबरदस्त फांडने गुंतवणूकदारांना मालामाल करून सोडलं आहे.
2500 SIP ने करोड रुपये कसे जमा होतील :
एसबीआयच्या हेल्थकेअर फंडाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा फंड 25 वर्षा जुना असून त्याने वर्षाला 18 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जग गुंतवणूकदारांनी SIP च्या माध्यमातून 2500 रुपयांचे गुंतवणूक केली आहे त्यांनी 1 करोडपेक्षा अधिक रक्कम कमावधी आहे.
एसबीआयचे हेल्थकेअर फंडाने 2500 च्या गुंतवणुकीतून 25 वर्षांमध्ये 1.18 करोड रुपये मिळवून दिले आहेत. यामधील केवळ गुंतवणुकीचे पैसे 7.50 लाख रुपये होते म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त व्याजाचे (1.10 करोड) रुपये मिळत आहेत.
फंड जास्तीत जास्त रिटर्न :
SBI Healthcare Opportunities Fund हा प्रचंड जोखीम असणारा फंड आहे. या फंडामध्ये मुख्य गुंतवणूक हेल्थकेअर सेक्टर माध्यमातून केले जाते. प्रचंड जोखीम असून सुद्धा हा फंड तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न मिळवून देतो. यामध्ये 93.23% एलोकेशन आहे.
एकरक्कमी गुंतवणुकीवर देखील घसघशीत परतावा :
एसबीआयचा हेल्थकेअर ऑपॉर्च्युनिटीज फंड एकरक्कम गुंतवणुकीवर देखील चांगला परतावा मिळवून देतो. समजा तुम्ही 25 वर्षांसाठी 1 लाख रुपयांची रक्कम गुंतवली असेल तर, 17.12% वार्षिक व्याजानुसार तुमच्याकडे 55 लाख रुपये जमा होतात. तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर लखपती आणि करोडपती व्हायचं असेल त्याचबरोबर भरपूर पैसे कमावून स्वतःच्या स्वप्नपूर्ती साकार करायच्या असतील तर, लवकरात लवकर म्युच्युअल फंडाविषयी माहिती करून घ्या.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.