
IPO GMP | तुम्ही सुद्धा आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी फायद्याची अपडेट आहे. उद्या अजून आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे, जो ग्रे मार्केटमध्ये १०९% प्रीमियमपर्यंत पोहोचला आहे. म्हणजे आयपीओ शेअर सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा मिळेल.
आयपीओ शेअर प्राईस बँड
डिफेन्स सोल्युशन्स प्रोव्हायडर कंपनी म्हणजे सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ लाँच होणार आहे. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीने आयपीओ’साठी २१४ ते २२६ रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचा आयपीओ शुक्रवार २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. या आयपीओ मार्फत ९९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम उभारण्याची कंपनीची योजना आहे.
ग्रे-मार्केट प्राईस
मीडिया रिपोर्टनुसार, सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स ग्रे-मार्केटमध्ये २४५ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. म्हणजेच या आयपीओ कंपनीचा शेअर 471 रुपयांवर सूचिबद्ध होण्याची शक्यता आहे. म्हणजेच शेअर सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना १०९ टक्के परतावा मिळू शकतो असे संकेत मिळत आहेत. आयपीओनंतर या कंपनीचे शेअर्स एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्म इमर्जवरसूचिबद्ध होतील. आयपीओ शेअर सूचिबद्ध होण्याची संभाव्य तारीख २९ नोव्हेंबर आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.