
Yes Bank Share Price | मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेड शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला (NSE: YESBANK) मिळाली होती. मंगळवारी येस बँक शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली होती. मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी येस बँक शेअर 5.01 टक्के वाढून 20.14 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक लिमिटेड अंश)
क्लासिक पिव्हट लेव्हल
मंगळवार 26 नोव्हेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 19.53 रुपये, 19.93 रुपये आणि 20.14 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 18.92 रुपये, 18.71 रुपये आणि 18.31 रुपये आहे.
शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस
येस बँक लिमिटेड शेअर मागील ५ दिवसात 4.03% वाढला आहे. येस बँक लिमिटेड स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार येस बँक शेअरमध्ये सकारात्मक संकेत दिसत आहेत.
कोटक ब्रोकरेज फर्म – शेअर रेटिंग
कोटक ब्रोकरेज फर्मने म्हटले की, ‘येस बँक लिमिटेडने अनेक निकषांमध्ये मोठ्या सुधारणा केल्या आहेत. तसेच कमी रेटिंग, उच्च उत्पन्न देणारे कॉर्पोरेट कर्ज पूर्णपणे काढून टाकले आहे. येस बँकेच्या व्यवस्थापनाने माहिती देताना सांगितले की, ‘बँकेने असुरक्षित रिटेल कर्जात वाढ करण्याचा पाठपुरावा केलेला नाही. येस बँकेतील क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि एमएफआय’चे प्रमाण प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत लक्षणीय रित्या कमी आहे. त्यामुळे कोटक आणि जेएम फायनान्शिअल या दोन ब्रोकरेज फर्मने येस बँकेवर ‘SELL’ रेटिंग दिली आहे.
शेअरने 62.81% परतावा दिला
मागील १ महिन्यात येस बँक शेअरने 4.03% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 12.62% घसरला आहे. मागील १ वर्षात येस बँक शेअरने 1.97% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हा शेअर 70.51% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना येस बँक शेअरने 62.81% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 11.08% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.