
RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड कंपनी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये (NSE: RVNL) आले आहेत. प्रत्यक्षात कंपनीला ६४२.५७ कोटी रुपयांची मोठी ऑर्डर (Gift Nifty Live) मिळाली आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या पॉवर इन्फ्रा प्रोजेक्टसाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी (L1) म्हणून आरव्हीएनएल समोर आली आहे. शुक्रवार 29 नोव्हेंबर 2024 रोजी आरव्हीएनएल शेअर 1.89 टक्के घसरून 434.95 रुपयांवर पोहोचला होता. (आरव्हीएनएल कंपनी अंश)
तपशील काय आहेत?
आरव्हीएनएल कंपनीला मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टमध्ये पंजाबच्या मध्यवर्ती भागात पॅकेज 3 अंतर्गत वितरक पायाभूत सुविधा संबंधित कामांचा समावेश आहे. आरव्हीएनएल कंपनीला मिळालेला हा कॉण्ट्रॅक्ट रिफॉर्म-बेस्ड आणि आउटकम-लिंक्ड रिफॉर्म डिस्ट्रीब्युशन एरिया स्कीमचा एक भाग आहे. पंजाब राज्यातील वीज वितरण कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट असलेल्या हाय टेन्शन (एचटी) आणि लो टेन्शन (एलटी) इन्फ्राच्या तोटा कमी करण्याच्या कामांचा या कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश आहे.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत कमी ऑपरेटिंग मार्जिन आणि कमी उत्पन्नामुळे रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३९४.३ कोटी रुपयांवरून २७ टक्क्यांनी घसरून २८६.९ कोटी रुपये झाला आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या कामकाजातून मिळणारे उत्पन्न दुसऱ्या तिमाहीतील ४,९१४.३ कोटी रुपयांच्या तुलनेत १.२ टक्क्यांनी घटून ४,८५५ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. दुसऱ्या तिमाहीत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या महसुलात 19.2% वाढ झाली.
RVNL शेअरने 2102% परतावा दिला
मागील ५ दिवसात RVNL शेअर 4.62% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 7.81% घसरला आहे. मागील ६ महिन्यात आरव्हीएनएल शेअरने 13.95% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 164.89% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आरव्हीएनएल शेअरने 1,716.08% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 138.98% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना आरव्हीएनएल शेअरने 2,102.28% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.