
CIBIL Score | सिबिल स्कोअर हा एक तीन अंकी नंबर असतो. जो तुमची फायनान्शिअल कंडिशन उघडपणे सांगू शकतो. सिबिल स्कोअरला डेबिट कार्ड आणि लायबिलिटीचा ग्रेड सिस्टम देखील म्हटले जाऊ शकते. तुम्ही कोणत्याही बँकेतून किंवा सरकारी संस्थेतून लोन घेणार असाल तर सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर तपासला जातो.
तुमचा तीन अंकी सिबिल स्कोअर 700 च्या घरात असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरच तुम्हाला लोन मिळू शकते. नाहीतर कोणत्याही ठिकाणाहून किंवा बँकांकडून, संस्थांमधून जास्त व्याजदराचे लोन घ्यावे लागेल. खराब सिबिल स्कोरमुळे तुम्हाला जास्त व्याजदराचे लोन मिळेल जे फेडताना तुमच्या नाकी नऊ येतील. तुमच्या सिबिल स्कोअरवर कोणत्या गोष्टी परिणामकारक ठरतात जाणून घ्या सविस्तर.
लोन रीपेमेंट हिस्ट्री :
समजा एखादा व्यक्ती क्रेडिट कार्डच्या मदतीने किंवा ई कॉमर्स साईटवरून एखादी वस्तू खरेदी करण्याकरिता ईएमआयवर लोन घेत असेल तर लोन वेळेवर फेडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु चुकून सुद्धा एका वेळेस लोनचे EMI भरले गेले नाही तर, तुमच्या लोन पेमेंट हिस्ट्रीवर निगेटिव्ह मार्किंग लागते. याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर पहायला मिळतो.
क्रेडिट मिस रिपोर्ट :
‘क्रेडिट मिस रिपोर्ट’ हा अशा पद्धतीचा रिपोर्ट असतो जो सांगतो की ग्राहकाने त्याचे EMI किंवा बिले, पेमेंट वेळेवर भरले नाहीत. तुम्हाला रिपोर्टनुसार लवकरात लवकर थकबाकी पेमेंट करणे गरजेचे आहे. समजा तुम्ही वेळेवर बिल भरले नाही तर तुम्हाला पुढील नवं लोन प्राप्त करण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्याचबरोबर कोणतीही बँक आणि संस्था देखील तुम्हाला लोन देणार नाही.
क्रेडिट कार्डचा रेश्यो देखील तपासतात :
सध्या क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड सुरू आहे. बऱ्याच तरुणांकडे क्रेडिट कार्ड असल्याचे सर्रासपणे पाहायला मिळते. बँक लोन देण्याआधी तुमच्या सिबिल स्कोरबरोबर क्रेडिट स्कोर देखील तपासून पाहते. समजा तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट 1 लाख रुपयांची आहे आणि तुम्ही या पैशांमधील 30 हजार रुपयांपेक्षा जास्त पैशांची खरेदी केली असेल तर, तुमचा क्रेडिट रेश्यो अत्यंत खराब मानला जातो. बरेच सल्लागार सांगतात की, तुमच्या क्रेडिट कार्डच्या लिमिटमधील केवळ 30% खर्च तुम्ही केला पाहिजे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.