Horoscope Today | ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रह-ताऱ्यांना प्रचंड महत्व आहे. कारण की ग्रह-ताऱ्यांच्या गोचरामुळे आणि भ्रमणामुळे प्रत्येकाच्या राशीवर वेगवेगळे परिणाम होताना पाहायला मिळतात. यामध्ये शुक्र आणि शनी या दोन ग्रहांना मोलाचे स्थान आहे. शुक्र हा बऱ्याच व्यक्तींसाठी आकर्षक ठरतो तर, शनी ग्रह प्रत्येकाला आपापल्या कर्मानुसार फळ देतो.
थोडक्यात काय तर, हे दोन ग्रह व्यक्तीला चांगल्या मार्गावर घेऊन येण्याचा प्रयत्न करतात. येत्या 3 दिवसांत शुक्र आणि शनि अर्धकेंद्र योग करणार आहेत. ज्याचा फायदा पुढील 3 राशींना होणार आहे.
मेष
शुक्र आणि शनीच्या अर्धकेंद्र योगामुळे मेष राशीला घवघवीत लाभ मिळणार आहे. या राशीमध्ये शनी अकराव्या तर, शुक्र दहाव्या घरामध्ये असेल. हा योग अत्यंत लाभदायी मानला जातो. त्यामुळे व्यवसायात चांगली संधी किंवा प्रमोशन वाढीची आनंदाची बातमी कामावर पडू शकते. बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील.
कन्या
कन्या राशींच्या व्यक्तींसाठी देखील शनि आणि शुक्राचा अर्धकेंद्र योग अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. बऱ्याच व्यक्तींची रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत तर, बऱ्याच जणांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. आज तुमचे वैवाहिक जीवन बहरेल. पत्नीच्या सोबत असल्यामुळे तुमचा दिवस अत्यंत आनंदात जाईल.
मकर
शनी आणि शुक्राचा अर्धकेंद्र योग मकर राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. अनेकांचे प्रेम संबंध बहरून जीवनाला नवीन वाटचाल मिळणार आहे. आज व्यावसायिक क्षेत्रात अनेकांना चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमची चांगली वाह वाह होईल. त्याचबरोबर कार्यक्षेत्र वाढेल.
Latest Marathi News | Grah Rashi Parivartan 02 December 2024 Marathi News.
