
Suzlon Share Price | सोमवारी स्टॉक मार्केटमध्ये दुपारच्या व्यवहारात किंचित वाढ (NSE: SUZLON) झाली होती. मात्र, सोमवारी ग्रीन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती. त्यामुळे सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा फोकसमध्ये (Gift Nifty Live) आला आहे. सोमवारी सुझलॉन एनर्जी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता. सोमवार 02 डिसेंबर 2024 रोजी सुझलॉन शेअर 4.99 टक्के वाढून 66.12 रुपयांवर पोहोचला होता. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)
सुझलॉन एनर्जी शेअर्स तेजीत
सोमवार ०२ डिसेंबर रोजा सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 4.99 टक्क्यांनी वधारून 66.12 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी अनेक एनर्जी शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 86.04 रुपये आहे, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 33.90 रुपये होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 89,512 कोटी रुपये आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची बैठक
या आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पतधोरण संबंधित बैठक पार पडणार आहे. आरबीआय’ची ही बैठक 4 ते 6 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर नियामक ग्रीन लेंडिंग मार्गदर्शक तत्त्वे तयार करू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
गुंतवणूकदारांना 3173% परतावा दिला
मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी शेअरने 2.72% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 0.30% घसरला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 32.24% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 64.89% परतावा दिला आहे. YTD आधारावर या शेअरने 71.74% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात सुझलॉन एनर्जी शेअरने 3,173.27% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.