 
						Business Idea | महिला असो किंवा पुरुष कोरोना काळापासून बऱ्याच व्यक्ती घरगुती आणि लघुउद्योगांकडे वळले आहेत. कोणी कॉटन मास्कचा बिझनेस करतात तर, कोणी घरगुती कापडी पिशव्यांचा. म्हणजेच काय तर, छोट्या बिजनेसपासून सुरुवात करून तुम्ही दीर्घकाळात मोठा फंड तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला दैनंदिन वापरातील अशा एका गोष्टीची बिझनेस आयडिया देणार आहोत जी ऐकून रिकामे बसलेले व्यक्ती लगेचच स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात करतील.
आज आम्ही तुम्हाला जी बिझनेस आयडिया सांगणार आहोत ती आहे कॉटन बड्सची. प्रत्येक व्यक्ती त्याच्या दररोजच्या वापरामध्ये कॉटन बड्सचा उपयोग करतो. कानाची स्वच्छता राखण्यासाठी बरेचजण कॉटन बड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. केवळ कान स्वच्छतेसाठी नाही तर, इतरही गोष्टींसाठी या छोट्या छोट्या कॉटन बड्सचा वापर केला जातो. तुम्ही घरच्या घरी हा बिजनेस सुरू करून लाखो रुपयांची रक्कम देखील कमवू शकता.
कॉटन बड्ससाठी लागणारे साहित्य :
1. सध्या मेड इन इंडियाचा जमाना सुरू आहे. बऱ्याच व्यक्ती भारतातील वस्तू वापरण्यावर जोर देत आहेत. अशातच कॉटन बड्सचा व्यवसाय सुरू केला तर तो तुफान चालेल. यासाठी तुम्हाला आवश्यक साहित्य लागेल.
2. कॉटन बड्स बनवण्यासाठी सर्वप्रथम मधला भाग तयार करावा लागेल. यासाठी तुम्हाला लाकडाची गरज भासेल. सध्या मार्केटमध्ये लाकूड आणि प्लास्टिक दोन्ही प्रकारचे कॉटन बड्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही प्लास्टिक किंवा लाकूड या दोघांपैकी कोणत्याही वस्तूचा वापर करू शकता.
3. कॉटन बड्स बनवण्यासाठी लाकूड किंवा प्लास्टिकची लांबी 5 ते 7 सेंटीमीटरपर्यंत असणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला होलसेल मार्केटमध्ये हे लाकूड किंवा प्लास्टिक आणखीन कमी पैशांत मिळून जाईल.
4. त्यानंतर तुमच्याजवळ कॉटन बड्स बनवण्यासाठी लागणारी मशीन देखील घ्यावी लागेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कापूस देखील घ्यावा लागेल. त्याचबरोबर लाकूड किंवा प्लास्टिकवर कापसाचे बोळे अगदी सहजपणे चिटकण्यासाठी योग्य गम देखील निवडावा लागेल.
कॉटन बड्ससाठी एक केमिकल देखील आहे महत्त्वाचे :
कॉटन बड्स अगदी सहजरीत्या तयार होण्यासाठी तुम्हाला सेल्युलोज पॉलिमर केमिकल विकत घ्यावे लागेल. ज्यामुळे कापूस भुरभुर करून उडणार नाही आणि तुमचा इयर कॉटन बड्स अगदी हुबेहूब बाजारात मिळणाऱ्या कॉटन बड्सप्रमाणेच दिसतील.
मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात या कॉटन बड्सची मागणी असलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी आपल्या परिवारासोबत मिळून हा बिजनेस सुरू करू शकता.
कोणकोणत्या ठिकाणी कॉटन बड्सचा वापर केला जातो :
बहुतांश व्यक्तींना हेच ठाऊक नसतं की, केवळ कान साफ करण्यासाठी आपण एवढा मोठा बिजनेस का बरं करावा. तर, या कॉटन बड्सचा उपयोग कॉस्मेटिक्स दुकाने, मोठमोठ्या ब्युटी पार्लर, जेंट्स सलून, पेंटिंग प्रॉडक्ट मार्केट, इलेक्ट्रॉनिक रिपेरिंग मार्केट, जनरल स्टोअर, मिनी स्टोअर या सर्व ठिकाणी वापर केला जातो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		