
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने गेल्या आठवड्यात टेलिकॉम टॉवर युनिट इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीमधील उर्वरित हिस्सा विकला आहे. त्यानंतर व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीने आपल्या प्रवर्तक व्होडाफोन ग्रुप पीएलसी’कडून प्रेफरेंशियल नवीन इक्विटी जारी करून १,९८० कोटी रुपये उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेनंतर या कंपनीचे शेअर्स पुन्हा फोकसमध्ये आले आहेत. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
शेअर ना ओव्हरबॉट झोनमध्ये, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये
टेक्निकल चार्टनुसार, ‘व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) ४९.३ इतका आहे, ज्यामुळे शेअर ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नसल्याचे संकेत दिसत आहेत. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये १ वर्षाचा बीटा २.२ आहे, जो या कालावधीत खूप चढ-उतार दर्शवितो. व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20-दिवस, 30-दिवसांपेक्षा जास्त परंतु 5-दिवस, 10-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस आणि 200-दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी आहेत.
प्रेफरेंशियल इक्विटी मार्फत 175.53 कोटी शेअर्स जारी करणार
व्होडाफोन ग्रुपच्या दोन कंपन्यांना १,९८० कोटी रुपये उभारण्यासाठी प्रेफरेंशियल इक्विटी मार्फत १७५.५३ कोटी शेअर्स जारी करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्होडाफोन आयडिया कंपनीने इश्यू प्राइस 11.28 रुपये प्रति शेअर ठेवला आहे. तसेच प्रेफरेंशियल इश्यूची फ्लोअर प्राइस निश्चित करण्याची संबंधित तारीख ०६ डिसेंबर २०२४ आहे, अशी माहिती व्होडाफोन आयडिया कंपनीने दिली.
मागील 6 महिन्यात शेअर 48% घसरला आहे
मंगळवार 10 डिसेंबर 2024 पासून गेल्या ५ दिवसात व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनी शेअर 1.46% घसरला आहे. गेल्या १ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअरने 3.45% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात व्होडाफोन आयडिया शेअर 48.77% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 38.40% घसरला आहे. मागील ५ वर्षात व्होडाफोन आयडिया शेअरने 17.39% परतावा दिला आहे. YTD आधारावर व्होडाफोन आयडिया शेअर 52.35% घसरला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये व्होडाफोन आयडिया शेअर 84.35% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.