
SIP Mutual Fund | तुम्हाला म्युच्युअल फंड SIP च्या माध्यमातून करोडपती बनायचं असेल तर, तुम्ही केवळ 5 हजार रुपयांची गुंतवणूक करून देखील करोडपती बनू शकता. एसआयपी ही एक अशा प्रकारची गुंतवणूक आहे ज्यामध्ये तुम्ही छोटी रक्कम गुंतवून देखील मोठा कॉर्पस तयार करू शकता.
एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही कंपाऊंडिंग व्याजाचा देखील लाभ घेऊ शकता. कोटींची रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला सुरू केलेली गुंतवणूक थांबवायची नाहीये. त्याचबरोबर गुंतवणुकीचे सातत्य ठेवून गुंतवणुकीत वाढ देखील करायची आहे. एसआयपी गुंतवणुकीचं कोटींचं शिखर गाठण्यासाठी तुम्हाला एका फॉर्मुल्याची मदत लागेल. तो फॉर्मुला म्हणजे 5:15:22.
5:15:22 Formula :
5, 15 आणि 22 हा एक अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर केवळ 5000 च्या एसआयपीने तब्बल 1 कोटींची रक्कम कमवू शकता. फॉर्म्युल्याचा पूर्ण अर्थ जाणून घेऊ. 5 म्हणजे प्रत्येक महिन्याला गुंतवणुकीचे 5000 रुपये. 15 म्हणजे गुंतवणुकीतून मिळणारे 15% रिटर्न आणि 22 म्हणजे तुम्हाला तुमची एसआयपी एकूण 22 वर्षांपर्यंत सुरू ठेवायची आहे.
इथे जाणून घ्या योग्य कॅल्क्युलेशन :
समजा एखादा गुंतवणूकदार एखाद्या 15% परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये 22 वर्ष 5,000 रुपयांची सातत्याने गुंतवणूक करत असेल तर, मॅच्युरिटीपर्यंत ही रक्कम 1 करोड 3 लाख 53 हजार रूपये बनेल. या पैशांमधील तुम्ही व्याजाचे केवळ 90,33,295 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्ही कमीत कमी पैशांची गुंतवणूक करून सुद्धा कोटींची रक्कम मिळवू शकता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.