 
						Bonus Share News | मंगळवारी स्टॉक मार्केट बंद होताच दोन कंपन्यांनी फ्री बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांनी बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. बोनस शेअर्स जारी झाल्याने या बातमीचा परिणाम या कंपन्यांच्या शेअर प्राईसवर होणार आहे. तुम्हाला या कंपन्यांच्या बोनस शेअर्सचा फायदा घ्यायचा असेल तर या रेकॉर्ड तारखांची नोंद घ्या.
Ceenik Exports Share Price
मंगळवारी सीनिक एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केट माहिती देताना म्हटले आहे की, ‘सीनिक एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअरसाठी विक्रमी तारीख निश्चित केली आहे. सीनिक एक्सपोर्ट्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ रोजी बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्यासाठी कॉर्पोरेट कारवाईची रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे.
20 नोव्हेंबर 2024 रोजी सीनिक एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक 5 शेअरमागे एक बोनस शेअर देण्याचे जाहीर केले होते. कंपनीकडून बोनस शेअर्ससहित लाभांशही जाहीर करण्यात आला होता. आता मंगळवारी कंपनीकडून स्टॉक मार्केट बंद झाल्यानंतर रेकॉर्ड तारीख जाहीर करण्यात आली. मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी सीनिक एक्सपोर्ट्स शेअर 1.82 टक्के वाढून 1,269.95 रुपयांवर पोहोचला होता. वर्षभरापूर्वी सीनिक एक्सपोर्ट्स शेअर १०५ रुपयांच्या खाली ट्रेड करत होता. त्यानंतर गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीत १२ पटीने वाढ झाली आहे.
Surya Roshni Share Price
मंगळवारी सूर्या रोशनी लिमिटेड कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स देण्यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. सूर्या रोशनी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘बोनस शेअर्स जारी करण्यासाठी कॉर्पोरेट ऍक्शनची रेकॉर्ड डेट 1 जानेवारी 2025 निश्चित करण्यात आली आहे. सूर्या रोशनी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ‘2 जानेवारी 2025 रोजी गुंतवणूकदारांना फ्री बोनस देण्यात येणार आहे. सूर्या रोशनी कंपनीने १४ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रति शेअर एक फ्री बोनस शेअर मंजूर केल्याची माहिती दिली होती. मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी सूर्या रोशनी शेअर 1.16 टक्के घसरून 554 रुपयांवर पोहोचला होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		