
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर मागील ५ दिवसात जवळपास 4.48 टक्क्यांनी घसरला आहे. आता व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मात्र या अपडेटमुळे त्याचा थेट परिणाम व्होडाफोन आयडिया शेअर प्राईसवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढणार आहे. (व्होडाफोन आयडिया कंपनी अंश)
कंपनीच्या ग्राहकांची संख्या अजून घटली
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने दिलेल्या नवीन अपडेटमुळे व्होडाफोन आयडिया शेअर्स गुंतवणूकदारांची चिंता अधिक वाढली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने ग्राहकांशी संबंधित ऑक्टोबर महिन्यातील अधिकृत डेटा जाहीर केला आहे. TRAI ने जाहीर केलेल्या या डेटानुसार व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचं समोर आलं आहे.
व्होडाफोन आयडिया कंपनीच्या स्पर्धकांचे ग्राहक वाढले
टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात व्होडाफोन आयडिया कंपनीने १९.७७ लाख ग्राहक गमावले आहेत. म्हणजेच १९.७७ लाख ग्राहकांनी मोबाईल क्रमांक पोर्ट करून कंपनीच्या स्पर्धकांची सेवा स्वीकारली आहे. कारण याच डेटानुसार एअरटेल कंपनीचे ग्राहक वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात एअरटेल कंपनीने एकूण १९.२८ लाख नवीन ग्राहक जोडले आहेत.
व्होडाफोन आयडिया शेअर्सची म्युच्युअल फंडांकडून विक्री
व्होडाफोन आयडिया शेअर्समधील हिस्सेदारी कमी करण्यास म्युच्युअल फंड कंपन्यांनी सुरुवात केली आहे. कारण, नोव्हेंबर महिन्यात म्युच्युअल फंड कंपन्यांनी व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात विकले आहेत. प्राइस डेटा-बेसने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ‘नोव्हेंबरमध्ये विविध म्युच्युअल फंड कंपन्यांनी व्होडाफोन आयडिया कंपनीचे जवळपास १६.३९ कोटी शेअर्स विकले आहेत. त्यामुळे व्होडाफोन आयडिया शेअर प्राईसवर याचे नकारात्मक परिणाम होण्याचे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.