 
						Personal Loan | काही व्यक्ती स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार बँकेकडून लोन प्राप्त करतात. ज्याला आपण पर्सनल लोन असं म्हणतो. परंतु आता नव्या वर्षा आरबीआयने वारंवार वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना आळा बसावा किंवा कोणत्याही प्रकारचे फ्रॉड होऊ नये म्हणून एक नवा नियम काढला आहे. हा नवा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे.
आरबीआयने या नव्या नियमाबाबत ऑगस्ट 2024 रोजी आदेश दिले होते. त्यानुसार रुजू झालेल्या नवीन नियमाप्रमाणे गरजेसाठी किंवा गरज नसून सुद्धा वारंवार वैयक्तिक लोन घेणाऱ्यांवर आळा बसला जाईल हे मात्र नक्की. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की, हा नवा नियम नेमका आहे तरी काय. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.
काय आहे नवीन नियम :
आरबीआयने जारी केलेल्या नवीन नियमाप्रमाणे पूर्वी पर्सनल लोन घेतल्यानंतर 1 महिन्याच्या कार्यकाळानंतर बँकेला क्रेडिट रेकॉर्ड दाखवावे लागायचे परंतु आता केवळ 15 दिवसांच्या गॅपमधून बँक तुमच्याजवळ असणारे क्रेडिट रेकॉर्ड चेक करणार. या नियमामुळे बऱ्याच गोष्टींना आळा बसेल जसं की, जोपर्यंत एक व्यक्ती एखादं घेतलेलं लोन पूर्णपणे फेडत नाही तोपर्यंत तो दुसरं लोन घेऊ शकत नाही. कारण की क्रेडिट कार्डचा रेश्योवर आणि स्कोर वरच तुम्हाला पुन्हा लोन मिळेल की नाही हे ठरते.
हा देखील होईल फायदा :
1. रिझर्व बँकेच्या या नियमामुळे लोन देणाऱ्या एजन्सीला क्रेडिट रेकॉर्ड तपासण्यासाठी क्षमता वाढेल.
2. त्याचबरोबर ऑगस्टमध्ये दिलेल्या आदेशानुसार त्याची अंमलबजावणी काहीही करून करायची होती त्यामुळे आता प्रत्येकजण केवळ गरजेसाठी आणि विचारपूर्वक पर्सनल लोन घेण्यात हा विचार करेल.
3. यापूर्वी महिन्याच्या वेगवेगळ्या तारखेनुसार इएमआय म्हणजेच पेमेंटची तारीख पडते. अशा परिस्थितीत क्रेडिट डेटा येण्यासाठी जास्त दिवस लागायचे. परंतु आता केवळ पंधरा दिवसानंतर तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोर डेटा बँकेला तपासणीसाठी द्यावा लागणार आहे.
4. 15 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रत्येकाचे क्रेडिट रेकॉर्ड तपासणी आणखीन सोपे झाले असून क्रेडिट इन्फॉर्मेशन आणि लोन व्यवस्था अगदी सुरळीतपणे काम करेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		