 
						Tata Technologies Share Price | परदेशी गुंतवणुकदारांच्या हालचाली आणि कॉपोरेट कंपन्यांचे तिमाही निकाल स्टॉक मार्केटची दिशा निश्चित करणार आहेत असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे तिमाही निकाल लवकरच जाहीर होणार आहेत. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत चोलामंडलम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने सकारात्मक संकेत दिले आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीज शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर 0.77 टक्क्यांनी घसरून 897.80 रुपयांवर पोहोचला होता. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,202 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 883.30 रुपये आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 36,372 कोटी रुपये आहे.
चोलामंडलम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म – टाटा टेक्नॉलॉजीज शेअर टार्गेट प्राईस
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर १२०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून २४ टक्क्यांनी घसरला आहे. चोलामंडलम सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत. चोलामंडलम सिक्युरिटीज ब्रोकरेजने टाटा शेअरवर ‘BUY’ रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ब्रोकरेजने या शेअरसाठी 1,082 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. ही टार्गेट प्राईस टाटा टेक्नॉलॉजीज शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा 20 टाक्यांनी अधिक आहे.
टाटा टेक्नॉलॉजीज शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरने 0.48% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 5.92% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 11.14% घसरला आहे. मागील १ वर्षात टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 23.35% घसरला आहे. लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर 26.450% घसरला आहे. तसेच YTD आधारावर टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरने 0.68% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		