IRFC Share Price | 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला IRFC शेअर, आता तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा – NSE: IRFC

IRFC Share Price | सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. या घसरणीत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा देणारा आयआरएफसी शेअर मागील ६ महिन्यात जवळपास 28.06 टक्क्यांनी घसरला आहे.

आयआरएफसी कंपनी शेअरची सध्याची स्थिती

सोमवार, 06 जानेवारी 2025 रोजी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 5.45 टक्क्यांनी घसरून 145.33 रुपयांवर पोहोचला होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 229 रुपये होता आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 99.55 रुपये होता. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,90,104 कोटी रुपये आहे.

आयआरएफसी कंपनी शेअर टार्गेट प्राईस

स्टॉक मार्केट विश्लेषक कुणाल बोथरा यांनी आयआरएफसीचे शेअर्ससाठी खरेदीची शिफारस केली आहे. कुणाल बोथरा यांनी आयआरएफसी शेअरसाठी १६० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच १४९ रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

तसेच काही शेअर बाजार तज्ज्ञांनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी स्टॉक साठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. विश्लेषकांनी इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना 180 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. तसेच 150 रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.

आयआरएफसी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी शेअर 1.60% घसरला आहे. मागील १ महिन्यात आयआरएफसी शेअर 8.02% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 28.06% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 45.40% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअरने 486.01% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये या शेअरने 564.21% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी शेअर 4.31% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRFC Share Price Monday 06 January 2025 Marathi News.