
Railway Ticket Booking | लांबचा पल्ला गाठायचा असेल तर, रेल्वे प्रवासी अगदी एक ते दोन महिनाआधीच रेल्वेचं तिकीट बुक करून ठेवतात. ऐनवेळेला लोकलच्या गर्दीने बऱ्याचदा आपल्याला तिकीट मिळण्याचे चान्सेस कमी असतात. आपला प्रवास अगदी सुखकर व्हावा यासाठी लोक लवकरात लवकर तिकीट बुक करून ठेवण्याचा निर्णय घेतात.
तिकीट बुक केल्यानंतर तुम्हाला केवळ आरामदायी सीट प्रदान होत नाही तर, इतरही सुविधांचा लाभ घेता येतो. बहुतांश व्यक्तींना रेल्वे तिकिटाच्या मागे प्रवाशांना कोणकोणत्या सुविधा मिळतात याबद्दल ठाऊक नाही. आज या बातमीपत्रातून आपण रेल्वेच्या संपूर्ण माहितीचा आढावा घेणार आहोत. रेल्वेतून मिळणाऱ्या या सुविधा तुम्हाला अगदी मोफत मिळतात परंतु आत्तापर्यंत फार कमी व्यक्तींना ही गोष्ट ठाऊक आहे. चला तर जाणून घेऊया रेल्वे तुम्हाला कोण कोणत्या सुविधा प्रदान करते.
वेटिंग हॉल सुविधा :
तुम्ही वेळेच्या आधीच स्टेशनवर हजर असाल आणि ट्रेन येण्यास अजून बराच अवकाश बाकी असेल तर, तुम्ही रेल्वेच्या वेटिंग हॉलमध्ये विश्रांती घेऊ शकता किंवा ट्रेन येण्याची वाट पाहू शकता. हे हॉल तुमच्या सोयीप्रमाणे असतात त्याचबरोबर तुम्ही एसी किंवा नॉन एसी हॉल तुमच्यासाठी निवडू शकता. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला याचे कोणत्याही प्रकारचे पैसे द्यावे लागणार नाही. ही सुविधा तुम्हाला पूर्णपणे मोफत दिली जाते.
संपूर्ण 1 महिना स्टेशनवर सामान ठेवण्यासाठी लॉकर :
बऱ्याचदा लांबचा प्रवास करण्यासाठी आपण आपल्या गरजेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सर्वच गोष्टी बांधून घेऊन जातो. परंतु काहीवेळा प्रवासादरम्यान आपल्याला थोडेफार सामान घेऊन जाण्यास जमत नाही. अशावेळी तुम्ही तुमचे काही सामान स्टेशनवर ठेवू शकता. बहुतांश रेल्वेस्थानकांवर लॉकर रूम उपलब्ध असतात. ही गोष्ट फार कमी व्यक्तींना ठाऊक असते. या लॉकर रूममध्ये तुम्ही एक महिन्यापर्यंत तुमचे सामान लॉक करून ठेवू शकता.
मोफत जेवणाची सुविधा :
रेल्वे तिकिटाची आणखीन एक महत्त्वाची सुविधा म्हणजे तुम्हाला अगदी मोफत जेवण देखील मिळू शकते. या परिस्थितीत समजा तुमची ट्रेन 2 तास उशिराने धावत असेल तर, रेल्वे कडून तुम्हाला जेवण दिले जाते. हे नियम आणि या सुविधा राजधानी, शताब्दी आणि दुरांतो यांसारख्या प्रीमियम रेल्वेमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान तुमच्या ट्रेनला येण्यास उशीर झाला असेल तरीसुद्धा तुम्ही थेट ट्रेनमध्ये बसल्यानंतर आरईई केटरिंग सर्विसच्या माध्यमातून मोफत जेवण ऑर्डर करू शकता.
तुम्ही रिफंड करण्यासाठी दावा करू शकता :
अशा बऱ्याच गाड्या आहेत ज्यामध्ये प्रवाशांना बेडरोल मिळतात. समजा तुम्हाला बेडरोल दिल्या नसेल तर, तुम्ही तक्रार करून तुमच्या रेल्वेच्या तिकिटाचे पैसे रिफंड करण्याची मागणी करू शकता.
बहुतांश भारतीय रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी एसी1, एसी2 आणि एसी3 या तिन्ही सेक्शनमध्ये प्रवाशांसाठी दोन बेडशीट, एक उशी आणि एक ब्लॅंकेट दिले जाते. जेणेकरून प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. परंतु गरीब रथ एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना या सर्व सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी 25 रुपये मोजावे लागतात.
मोफत प्राथमिक उपचार :
बऱ्याच व्यक्तींना प्रवासादरम्यान वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात. काहींना धुळीचा त्रास होतो तर, काहींना दम्याच्या त्रासामुळे प्रवास कठीण वाटतो. समजा अचानक तुमची तब्येत रेल्वे प्रवासादरम्यान बिघडली तर, रेल्वे पेशंटचे मोफत प्राथमिक उपचार करते. त्यामुळे तुमची प्रकृती ढासळल्यास सर्वप्रथम फ्रंट लाईन कर्मचारी किंवा तिकीट कलेक्टरला संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. एवढंच नाही तर प्रवाशाची जास्त प्रमाणात तब्येत बिघडू लागली तर, रेल्वे पुढील स्थानकावर थांबून प्रवाशाला चांगल्या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जाते आणि जो काही खर्च लागेल तो स्वतःच करते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.